मराठी भाषा संवर्धन पंधरवडा उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:27 IST2021-02-05T09:27:12+5:302021-02-05T09:27:12+5:30
वाशिम : महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण व वाशिम जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशानुसार रिसोड तालुका विधी सेवा समिती ...

मराठी भाषा संवर्धन पंधरवडा उत्साहात
वाशिम : महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण व वाशिम जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशानुसार रिसोड तालुका विधी सेवा समिती व विधिज्ञ मंडळाच्यावतीने रिसोड दिवाणी न्यायालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दिनांक १४ जानेवारी रोजी मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचे उद्घाटन दिवाणी न्यायाधीश तथा तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष वाय. डी. कोईनकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सहदिवाणी न्यायाधीश आशिष सूर्यवंशी, विधिज्ञ पी. एस. देशमुख, सरकारी वकील आरु, तालुका विधिज्ञ संघाचे अध्यक्ष पांडे, सचिव जाधव, विधिज्ञ दत्ता महाजन, पंडित उपस्थित होते. यावेळी ‘मराठी भाषेचे महत्त्व’ या विषयावर मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विधिज्ञ इरतकर यांनी केले तर देशपांडे यांनी आभार मानले.
दिनांक २० जानेवारी रोजी आयोजित कार्यक्रमात व्याख्याते डॉ. प्रदीप हाडे यांनी ‘मराठी भाषेचे संवर्धन’ या विषयावर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दिवाणी न्यायाधीश तथा तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष वाय. डी. कोईनकर होते. यावेळी सहदिवाणी न्यायाधीश आशिष सूर्यवंशी उपस्थित होते. कार्यक्रमात विधिज्ञ एस. डी. देशमुख, रिसोड विधिज्ञ मंडळाचे अध्यक्ष एस. पी. भारती, सचिव ए. पी. सहातोंडे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी विधिज्ञ एन. एच. देशमुख, एस. डी. डहाळके, एस. आर. जाधव, एस. एस. देशपांडे, एन. बी. भराड, एस. व्ही. इप्पर उपस्थित होते.
दिनांक २६ जानेवारी रोजी मराठी कविता, चारोळी, गीतगायन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दिवाणी न्यायाधीश तथा तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष वाय. डी. कोईनकर होते. यावेळी सहदिवाणी न्यायाधीश आशिष सूर्यवंशी उपस्थित होते. २८ जानेवारी रोजी मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याची सांगता करण्यात आली. दिवाणी न्यायाधीश तथा तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष वाय. डी. कोईनकर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी सहदिवाणी न्यायाधीश आशिष सूर्यवंशी, सहाय्यक सरकारी अभियोक्ता आरु, रिसोड विधिज्ञ मंडळाचे अध्यक्ष एस. पी. भारती, सचिव ए. पी. सहातोंडे यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोरे यांनी केले. यावेळी न्यायालयीन कर्मचारी, पोलीस कर्मचारी व पक्षकार उपस्थित होते.