शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी आणखी एका तरुणाने घेतला विषाचा घोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2018 20:39 IST

Maratha Reservation: तालुक्यातील 18 वर्षीय युवकाने राहत्या घरात विषाचा घोट घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मोहगव्हाण येथे आज 30 जुलै रोजी सायंकाळी ही घटना घडली. पवन माणिक डुबे असे युवकाचे नाव असून गावकऱ्यांनी त्याला तातडीने उपचारासाठी हलविले.

वाशीम : तालुक्यातील 18 वर्षीय युवकाने राहत्या घरात विषाचा घोट घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मोहगव्हाण येथे आज 30 जुलै रोजी सायंकाळी ही घटना घडली. पवन माणिक डुबे असे युवकाचे नाव असून गावकऱ्यांनी त्याला तातडीने उपचारासाठी हलविले. यावेळी त्याच्या खिशात आढळून आलेल्या चिठ्ठीवरुन मराठा समाजाच्या आरक्षणासाठी त्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली. वाशीम येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू असून प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे समजते.            आरक्षणाच्या मागणीसाठी औरंगाबाद जिल्ह्यात काकासाहेब शिंदे यांनी जलसमाधी घेवून बलिदान दिले. या घटनेमुळे राज्यभरात मराठा समाजाची आंदोलने सुरू झाली. तर आरक्षणासाठी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलतानाही मराठा समाजातील आंदोलक दिसत आहेत. गेल्या आठवड्यापासून जिल्ह्यात दरदिवशी सुरू असलेले आंदोलने किरकोळ अपवाद वगळता शांततेत सुरु आहेत. मराठा आरक्षणाचा मुद्दा विविध प्रसार माध्यमांनीही लावून धरला आहे. 

सोमवारी मोहगव्हाण येथील डुबे कुटुंब शेतात गेले होते. घरी एकटाच असलेला पवन दुरचित्रवाणीवर आरक्षणाविषयीच्या बातम्या पाहून आवेशात आला. यातूनच त्याने सायंकाळी 5.30 च्या सुमारास घरात असलेले किटकनाशक पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. सदर प्रकार शेजारी राहत असलेल्या नातेवाईकांच्या लक्षात आल्याने गावकऱ्यांच्या मदतीने त्याला तातडीने उपचारासाठी हलविण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून तो मराठ्यांच्या आरक्षणावरुन चिंतेत राहत असल्याची माहिती कुटुंबियांनी दिली. तर त्याच्या खिशात आरक्षणासाठीची चिठ्ठीही आढळून आली आहे. याप्रकरणी पोलिसांत नोंद घेण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरु होती.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणmarathaमराठाMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाwashimवाशिम