जिल्ह्यातील मानोरा तालुका झाला कोरोनामुक्त,

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:46 IST2021-01-13T05:46:09+5:302021-01-13T05:46:09+5:30

वाशिम जिल्ह्यात एप्रिल २०२० च्या पहिल्या आठवड्यात कोरोनाने शिरकाव केला, तथापि, आरोग्य विभागाच्या परिश्रमामुळे या रुग्णाने कोरोनावर मात केली. ...

Manora taluka of the district became corona free, | जिल्ह्यातील मानोरा तालुका झाला कोरोनामुक्त,

जिल्ह्यातील मानोरा तालुका झाला कोरोनामुक्त,

वाशिम जिल्ह्यात एप्रिल २०२० च्या पहिल्या आठवड्यात कोरोनाने शिरकाव केला, तथापि, आरोग्य विभागाच्या परिश्रमामुळे या रुग्णाने कोरोनावर मात केली. ऑगस्टपासून कोरोना संसर्गाचा जिल्ह्यात अतिरेक झाला आणि ऑगस्ट ते ऑक्टोबर २०२० या कालावधितच ५ हजारांहून अधिक लोकांना कोरोना संसर्ग झाला. जिल्ह्यात १२ जानेवारीपर्यंत ६८०३ लोकांना कोरोना विषाणू संसर्गाची बाधा झाली, त्यापैकी ६५४४ रुग्णांनी कोरोनावर मात केली, तर १५१ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

--------

तीन तालुक्यांची कोरोनामुक्तीकडे वाटचाल

सद्यस्थितीत मानोरा तालुक्यात गत १४ दिवसात एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला नाही, तर मालेगाव तालुक्यात १०, मंगरुळपीर तालुक्यात १३ आणि कारंजा तालुक्यात १५ रुग्ण आढळून आले. त्यामुळे या तालुक्यांची कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरू आहे. वाशिम तालुक्यात गत १४ दिवसात ४३ रुग्ण आढळले, तर रिसोड तालुक्यात ३२ रुग्ण आढळले. नव्या वर्षात कोरोना विषाणू संसर्गाचा वेग मंदावला आणि गत १२ दिवसात केवळ १४१ लोकांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाला, तर याच कालावधीत १८४ रुग्णांनी कोरोनावर मात केली. सद्यस्थितीत वाशिम जिल्ह्यात केवळ १०७ रुग्णबाधित आहेत.

--------

वाशिम ४५

रिसोड ३४

मं.पीर १३

कारंजा १५

Web Title: Manora taluka of the district became corona free,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.