वाशिम : जिल्ह्यातील मानोरा आणि मालेगाव या दोन ग्रामपंचायतींचे रुपांतर नगर पंचायतींमध्ये होवून सुमारे दीड वर्षाचा कालावधी उलटला आहे. मात्र, ग्रामपंचायतीमधील कर्मचाºयांचे नगर पंचायतीमध्ये अद्याप समायोजन झालेले नाही. याकडे लक्ष पुरवून ग्रामपंचायत कर्मचाºयांना नगर पंचायतमध्ये सामावून घेत त्यांना त्यानुसार, सुविधा लागू करण्याची मागणी संबंधित कर्मचाºयांनी केली.१७ जुलै २०१६ रोजी मालेगाव ग्रामपंचायतचे नगरपंचायतमध्ये रुपांतर झाले. त्यास आजमितीस १७ महिण्याचा कालावधी उलटूनही नगर पंचायतच्या धोरणानुसार कर्मचाºयांना पगार सुरू झालेला नाही. सद्याच्या महागाईच्या काळात तुटपूंज्या पगारीवर कुटूंब चालविणे कठीण झाले आहे. ही बाब लक्षात घेवून नगर पंचायतमध्ये समायोजन करावे, अशी मागणी कर्मचाºयांनी शासनाकडे अनेकवेळा केली. मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नसल्याची माहिती कर्मचारी गणेश भनंगे, रामदास माने, महादेव राऊत, अवि काटेकर, सतीश महाकाळ, गोपाल काटेकर, शंकर बळी, अतुल बळी, श्रीराम सुर्वे, सै. इरफान, उषा खोडे, शंकर खोडे, शंकर इंगोले, संतोष खवले, प्रकाश बळी, पुंजाजी पखाले, विठ्ठल चोपडे, गणेश भालेराव, संजय दहात्रे, रामदेव शर्मा, रवि शर्मा, इंद्रायणी अवचार आदिंनी दिली.
मानोरा, मालेगाव नगर पंचायत: कर्मचारी समायोजनाचा प्रश्न अद्याप ‘जैसे थे’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 13:35 IST