शहरं
Join us  
Trending Stories
1
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
2
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार
3
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
6
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
7
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
8
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
9
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
10
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
11
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
12
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
13
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
14
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
15
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
16
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!

माणिकराव ठाकरे की भावना गवळी : निवडणूक निकालाची उत्सुकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2019 2:09 PM

वाशिम : यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाचा निकाल दोन दिवसांवर येऊन ठेपला असून, २३ मे रोजी दोन दिग्गज उमेदवारांचे राजकीय भवितव्य ठरविणारे आकडे यंत्रातून बाहेर पडतील.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाचा निकाल दोन दिवसांवर येऊन ठेपला असून, २३ मे रोजी दोन दिग्गज उमेदवारांचे राजकीय भवितव्य ठरविणारे आकडे यंत्रातून बाहेर पडतील. या निवडणुकीत बाजी कोण मारणार, काँग्रेसचे माणिकराव ठाकरे की शिवसेनेच्या भावना गवळी? याकडे संपूर्ण मतदारसंघाचे लक्ष लागून आहे.लोकसभेच्या यवतमाळ-वाशिम मतदारसंघात जिल्ह्यातील वाशिम व कारंजा या दोन विधानसभा तसेच यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव, यवतमाळ, दिग्रस, पुसद या चार विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. यावेळी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, शिवसेनेच्या खासदार भावना गवळी या प्रमुख उमेदवारांसह एकूण २४ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. या मतदारसंघासाठी ११ एप्रिल रोजी मतदान झाले असून, गत पंचवार्षिकच्या तुलनेत यावर्षी सव्वा दोन टक्क्याने मतदानात वाढ झाली होती. १९ लाख १४ हजार ७८५ मतदारांपैकी ११ लाख ६९ हजार ८०६ मतदारांनी २२०६ केंद्रांवर मतदानाचा हक्क बजाविला होता. ११ एप्रिल रोजी मतदान झाल्यापासून प्रमुख राजकीय पक्षांचे नेते व कार्यकर्ते विजय आपलाच असा दावा करीत आहेत. दुसरीकडे प्रशासन मात्र मतमोजणीच्या तयारीत गुंतले आहे. २३ मे रोजी यवतमाळ येथे मतमोजणी होणार असल्याने जिल्हा प्रशासनाने संपूर्ण तयारी केली आहे. मतमोजणीच्या एकूण ३० फेऱ्या राहणार आहे. एखाद्याला मतमोजणीदरम्यान आक्षेप नोंदवावयाचा असेल तर त्याला लेखी स्वरुपाचा अर्ज सादर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर करावा लागणार आहे. दरम्यान, निवडणुक निकालाची उत्सुकता शिगेला पोहचली असून वाढीव मते कुणाच्या बाजूने असतील, एक्झिट पोल काय सांगतात, विजयी कोण होणार ठाकरे की गवळी? या चर्चेन मतदारसंघ ढवळून निघत आहे. कार्यकर्त्यांकडून दावे, प्रतिदावे, अंदाजे बांधले जात आहे. प्रमुख लढत ही काँग्रेसचे माणिकराव ठाकरे व शिवसेनेच्या भावना गवळी या दोन उमेदवारांमध्ये झाली असून, दोन्ही बाजूचे कार्यकर्ते सोशल मीडियावर विजयाचे गणित मांडू लागले आहेत. निवडणुकीत कोण बाजी मारणार? याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. (प्रतिनिधी)

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९yavatmal-washim-pcयवतमाळ-वाशिमwashimवाशिम