मांगवाडीचे टरबूज विक्रीसाठी कोलकाता, दिल्लीला रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:37 IST2021-04-05T04:37:12+5:302021-04-05T04:37:12+5:30
रिसोड : तालुक्यातील मांगवाडी येथील टरबूज विक्रीसाठी थेट भारताची राजधानी दिल्ली व कोलकाता येथे पाठविण्यात आले आहे. त्याठिकाणी टरबूजाला ...

मांगवाडीचे टरबूज विक्रीसाठी कोलकाता, दिल्लीला रवाना
रिसोड : तालुक्यातील मांगवाडी येथील टरबूज विक्रीसाठी थेट भारताची राजधानी दिल्ली व कोलकाता येथे पाठविण्यात आले आहे. त्याठिकाणी टरबूजाला असलेली मागणी व तुलनेने अधिक दर मिळत असल्याने टरबूज उत्पादक शेतकऱ्यांचाही फायदा होत आहे.
मांगवाडी येथील माजी सरपंच नामदेव देव्हारे यांच्याकडे केवळ चार एकर शेती आहेत. त्यातील एक एकर शेतात त्यांनी टरबूजाची लागवड केली होती. त्यातून त्यांना १४ टन उत्पादन झाले. टरबूज परिपक्व झाले तेव्हा बाजारभाव अचानक कमी झाले. पाच रुपये रुपये किलो याप्रमाणे स्थानिक बाजारपेठेत टरबुजाची विक्री सुरू आहे. यामुळे मात्र लागवड खर्चही वसूल होतो की नाही, असा प्रश्न निर्माण झाला होता. दरम्यान, देव्हारे यांनी दिल्ली आणि कोलकाता येथील बाजारपेठेत टरबूजाला मिळत असलेल्या दराची माहिती घेऊन टरबूज दिल्ली व कोलकाताकडे रवाना केले. त्याठिकाणी प्रतिटन ७ हजार रुपये दर मिळत असल्याचे देव्हारे यांनी सांगितले.