मंगरूळपीर वीज विभागाकडे १0 लाखांचा कर थकीत!
By Admin | Updated: April 1, 2017 02:34 IST2017-04-01T02:34:53+5:302017-04-01T02:34:53+5:30
रक्कम अदा न केल्यास कार्यालय होणार ‘सील’

मंगरूळपीर वीज विभागाकडे १0 लाखांचा कर थकीत!
मंगरूळपीर : येथील वीज वितरणच्या कार्यालयाकडे नगर परिषदेचा १0 लाख ९७ हजार ५७९ रुपये कर थकीत आहे. दरम्यान, ३१ मार्च रोजी नगर परिषदेने या कार्यालयावर धडक देऊन सील ठोकण्याचा पवित्रा अंगिकारला; मात्र यावेळी तडजोड होऊन येत्या ५ १ दिवसांत कर अदा करण्याचे ठरले. त्यामुळे ही कारवाई तूर्तास स्थगित करण्यात आली.
वीज वितरण कार्यालयाने पूर्वीच्या थकबाकीसह १ एप्रिल २0१६ पासून ३१ मार्च २0१७ पर्यंंतचा कर अदा केला नाही. ती रक्कम आजमितीस १0 लाख ९७ हजार ५७0 रुपये झाली आहे. तथापि, येत्या पाच दिवसांत कराची रक्कम अदा न केल्यास उपकार्यकारी अभियंता यांचे कार्यालय, उपविभागीय कार्यालय, ३३ केव्ही वीज उपकेंद्रातील सर्व साहित्य जप्त करण्यात येईल, असे नोटिसमध्ये नमूद करण्यात आले आहे. यामुळे वीज वितरण विभागाचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.