मंगरूळपीरचा रोशन चव्हाण राष्ट्रीय टेनिस व्हॉलिबॉल संघात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2017 20:03 IST2017-08-22T20:02:47+5:302017-08-22T20:03:15+5:30

Mangrolipir Roshan Chavan in the national tennis volleyball team | मंगरूळपीरचा रोशन चव्हाण राष्ट्रीय टेनिस व्हॉलिबॉल संघात 

मंगरूळपीरचा रोशन चव्हाण राष्ट्रीय टेनिस व्हॉलिबॉल संघात 

ठळक मुद्देरोशन जय गजानन महाराज क्रीडा मंडळाचा खेळाडू थायलंड येथे होणा-या दक्षिण आशियाई व्हॉलिबॉल स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करणार

लोक मत न्यूज नेटवर्क 
मंगरुळपीर:  वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर येथील जय गजानन महाराज क्रीडा मंडळाचा खेळाडू रोशन किशोर चव्हाण याची राष्ट्रीय टेनिस व्हॉलिबॉल संघात निवड झाली आहे. थायलंड येथे १ ते ६ सप्टेंबरदरम्यान होणा-या दक्षिण आशियाई व्हॉलिबॉल स्पर्धेत तो भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व करेल. याबद्दल जिल्हा टेनिस व्हॉलिबॉल असोसिएशनवतीने सोमवारी सत्कार करण्यात आला.
मध्यप्रदेश येथे पार पडलेल्या राष्ट्रीय टेनिस व्हॉलिबॉल स्पर्धेत रोशन चव्हाणने महाराष्ट्र संघाचे नेतृत्व करताना  उत्कृष्ट प्रदर्शन करून संघाला पुरस्कार मिळवून दिला. त्याच्या उत्कृष्ट पदर्शनाची दखल घेत त्याची भारतीय संघात निवड करण्यात आली. त्याच्या निवडीबद्दल वाशिम जिल्हा टेनिस व्हॉलिबॉल असोसिएशनच्यावतीने त्याला शिल्ड आणि शाल, श्रीफळ देऊन गौरविण्यात आले. यावेळी जय गजानन क्रीडा मंडळाचे अध्यक्ष संजय मिसाळ व वाशिम जिल्हा टेनिस व्हॉलिबॉल असोसिएशनचे सचिव प्राचार्य डॉ. विवेक गुल्हाने, वाशिम जिल्हा क्रीडा प्रशिक्षक सागर गुल्हाने उपस्थित होते. 

Web Title: Mangrolipir Roshan Chavan in the national tennis volleyball team