मंगरुळपीर तालुका कोरड्या दुष्काळाच्या छायेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 16:52 IST2017-10-06T16:51:34+5:302017-10-06T16:52:04+5:30

Mangarulpir taluka under dry drought shelter | मंगरुळपीर तालुका कोरड्या दुष्काळाच्या छायेत

मंगरुळपीर तालुका कोरड्या दुष्काळाच्या छायेत

ठळक मुद्देनदीपात्र पडले कोरडे तालुक्यात ६६ टक्केच पाऊस


 मंगरुळपीर : तालुक्यात यावर्षी अत्यल्प पाऊस पडल्यामुळे पाण्याचे दुर्भीक्ष आतापासूनच जाणवायला लागले आहेत. शहरालगतच्या नदीला एकही अपेक्षीत पुर आला नाही. त्यामुळे नदीचे पात्र कोरड्या स्थितीत आहे. तसेच तालुक्यातील काही तलाव कोरडे तर बहूतांश तलावाची पाण्याची मोठ्या प्रमाणात खालावल्याने यावर्षी शासनाला  ऐन हिवाळयातच पाणी टंचाईवर मात करण्यासाठी उपाय योजना करणे गरजेचे आहे असे विदारक स्थिती निर्माण झाली आहे.

यावर्षी तालुक्यात सरासरीपेक्षा कमी म्हणजे ६६.७ टक्के पाऊस  पडला आहे. त्यामुळे तालुक्यातील कवठळ, सार्सी, १ सार्सी १, चांधई, दस्तापुर, हिवरा व मोहरी या तलावाची एलएसएल च्या खाली  गेली आहे तर मोतसावंगा  ७.५२, पिंप्री ०३४, सावरगाव ४ टक्के,  कोळंबी ५.८८,  सिंगडोह ४.४३,  नांदखेडा २४.९५,  चोरद ४० टक्के,  झोडगा ३२.५०, उंद्री ३२.७० , जोगदलदरी २७.११, कासोळा ११.४२ या तलावाची पाणी पातळी चिंताजनक आहे. त्यामुळे   यावर्षी  हिवाळ्यातच तीव्र पाणी टंचाई निर्माण होण्याची चिन्हे आहे.  यावर्षी खरीप हंगाम पाण्याअभावी हातचा गेला तर रब्बी हंगाम पाण्याअभावी घेणे शक्य नाही यासह गुरांचा चाºयाचा पिण्याचा पाण्याची बिकट होणार आहे. नदी, नाले, पुर्तता कोरडे पडल्याने आताच पशुपालकांना उपलब्ध विहीरीतील पाणी काढुन आपल्या पशुची तहान भागवावी लागत आहे. मोतसावंगा प्रकल्पातुन मंगरुळपीर शहरासह २१ गावांना पाणी पुरवठा केला जातो  मात्र यावर्षी  शहरासह २१ गावांना तीव्र पाणी टंचाईची झळ सोसावी लागणार आहे. अशा विपरीत परिस्थितीतमुळे पाणी टंचाईवर मात करणे अश्क्यप्राय असुन यावर लोकप्रतिनिधी व शासनाने उपाय योजना करण्यासाठी नियोजन करणे आवश्यक आहे ,मात्र यावर शासन व लोकप्रतिनिधी गांभीर्याने होत नसल्याचे दिसुन येते.

Web Title: Mangarulpir taluka under dry drought shelter