शेलूखडसे रस्त्यावर मानवी शिर आढळले
By Admin | Updated: March 11, 2017 02:24 IST2017-03-11T02:24:06+5:302017-03-11T02:24:06+5:30
रिसोड तालुक्यातील घटना.

शेलूखडसे रस्त्यावर मानवी शिर आढळले
रिसोड, दि. १0- शेलूखडसे रस्त्यावरील पुलाखाली मानवी शिर आढळून आले. हा प्रकार १0 मार्च रोजी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास उघडकीस आला.
नित्यनेमाप्रमाणे सायंकाळी फेरफटका मारायला गेलेले सुभाष पवार, डॉ. इरतकर यांना पुलाखाली मानवी शिर असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ या घटनेची माहिती भ्रमणध्वनीवरून रिसोड पोलिसांना दिली. त्यावरून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत शिराची पाहणी केली व शरीराचा उर्वरित भाग कुठे मिळतो का, याची तपासणी केली. अर्धवट असलेले हे मानवी शिर जळालेल्या अवस्थेत असल्याने त्याची ओळख पटू शकली नाही.