मशिदीमध्ये आल्याने मनुष्य सुसंस्कृत होतो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:22 IST2021-02-05T09:22:02+5:302021-02-05T09:22:02+5:30
शहरातील मिल्लतनगर भागातील फातेमा मशिदीमध्ये हा कार्यक्रम पार पडला. मशीद म्हणजे काय, हे अन्य धर्मीयांना माहीत व्हावे, यासाठी मराठी ...

मशिदीमध्ये आल्याने मनुष्य सुसंस्कृत होतो
शहरातील मिल्लतनगर भागातील फातेमा मशिदीमध्ये हा कार्यक्रम पार पडला. मशीद म्हणजे काय, हे अन्य धर्मीयांना माहीत व्हावे, यासाठी मराठी भाषेत घेण्यात आलेल्या या कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ.रफीक पारनेरकर उपस्थित होते. पारनेरकर यांनी मशिदीमध्ये होणाऱ्या विविध विधींबद्दल त्यांनी उपस्थितांना माहिती दिली. अजानमधील शब्दांचे अर्थ व अजान का दिली जाते, नमाज कशी पठण केली जाते, याबद्दल त्यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक मो.जुनेद यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन शे.वकार यांनी करून आभार मानले. कार्यक्रमाच्या शेवटी जमात-ए-इस्लामी संघटनेकडून मशीद परिसरात लावण्यात आलेल्या पुस्तक स्टॉलवरून लोकांनी इस्लाम धर्माबद्दलच्या माहितीची पुस्तके संकलित केली. कार्यक्रमाला भिकुचंद खंडेलवाल, शिवलाल शर्मा, अग्रवाल सेठ, जोशी, श्याम चव्हाण, राजू हाजे, सचिन देशमुख, गजानन कोल्हे, रामकिसन दवंड, दीपक सोनुने, गजानन खंडारे यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी जमात-ए-इस्लामीच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.