पहिल्या सभेकडे मालेगावकरांचे लक्ष
By Admin | Updated: February 29, 2016 02:15 IST2016-02-29T02:15:19+5:302016-02-29T02:15:19+5:30
आज नगरपंचायतची पहिली सर्वसाधारण सभेत तब्बल ४३ ठराव मांडणार.

पहिल्या सभेकडे मालेगावकरांचे लक्ष
मालेगाव : मालेगाव ग्रा.प.चे नगरपंचायतमध्ये रूपांतर झाले. त्यामध्ये १७ सदस्य निवडून आले. नगरपंचायतीची पहिली मासिक सभा २९ फेब्रुवारी रोजी होणार असून, त्यामध्ये विकासाच्या दृष्टीने काय- काय ठराव पास होतात, याकडे समस्त जनतेचे लक्ष लागले आहे. मालेगाव ग्रा.प. यापूर्वी भाजपच्या ताब्यात होती. आता नगरपंचायत काँग्रेस- राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे. ह्यनवा गडी नवा राजह्ण या उक्तीप्रमाणे शहरात आता विविध सुविधांच्या दृष्टिकोणातून पावले उचलल्या जाण्याची अपेक्षा आहे. नगरपंचायत पुढे गावातील स्वच्छता अभियान, रस्ते, वीज, पिण्याचे तसेच वापरण्याच्या पाण्याचा प्रश्न, गावातील नाली बांधकाम, नाल्या दुरुस्ती, शहरातील वाढणारे अतिक्रमण, आर्थिक दुर्बल घटकांना घरकुल देणे यासह मुख्य समस्या आहेत. अनेक प्रभागात महिनो महिने नाल्या काढल्या जात नाहीत. त्यामुळे शहरातील काही प्रभागात दुर्गंंधीचे वातावरण तयार झाल्याने डास निर्माण होऊ शकतात. त्यामुळे प्रभागनिहाय नाली सफाई, जंतूनाशक औषधांच्या फवारणीचे नियोजन होणे आवश्यक आहे. शहराची ओळख स्वच्छ व सुंदर म्हणून होण्यासाठी १९ ही नगरसेवकांनी पुढाकार घेऊन जागोजागी कचराकुंडी, कचरा नेण्यासाठी घंटागाडीची नियमित व्यवस्था करणे गरजेचे आहे. शहरात प्लास्टिक पिशवीवर बंदी आणून त्याची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. जुन्या बसस्थानकावर प्रवाशी निवार्याअभावी प्रवाशांना हाल सोसावे लागत असू, प्रवासी निवारा तसेच स्वच्छतागृह जुन्या बसस्थानकासह शहरात विविध ठिकाणी उभारणे गरजेचे आहे. २९ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजता होणार्या सभेबाबत अधिक माहिती जाणून घेतली असता तब्बल ४३ ठराव शहर विकासासाठी सभेपुढे ठेवण्यात येणार असल्याचे समजते. त्यामध्ये पाणीपुरवठा, शहरातील बोअरवेल दुरुस्ती, नगरपंचायत बांधकाम, नगरपंचायत रंगरंगोटी, घंटागाडी खरेदी, बोअरवेल अधिग्रहण करणे, नादुरुस्त मोटारी दुरुस्त करणे, वार्षिक अंदाजपत्रक तयार करणे, ग्रा.प. व जि.प.च्या मालकीच्या जागा हस्तांतरित करणे, व नोंद करणे, सभापती कार्यालय फर्निचर केबीन तयार करणे, एलईडी लाइट खरेदी करणे, बांधकाम अर्जांंना परवानगी देणे, यासह अनेक ठराव सभेपुढे मांडण्यात येणार आहेत. याकडे सर्वांंचे लक्ष लागले आहे.