मालेगाव बसस्थानक अडकले समस्यांच्या विळख्यात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2017 13:21 IST2017-11-03T13:19:16+5:302017-11-03T13:21:32+5:30
मालेगाव : मालेगाव शहारातिल बस स्थानक समस्यांच्या विळख्यात अडकले आहे .पेयजलाचा अभाव ,तुटलेले कुम्पन स्वच्छता ग्रुहाची दूरावस्था आदि समस्यांच्या विलख्यात अडकले आहे .

मालेगाव बसस्थानक अडकले समस्यांच्या विळख्यात!
मालेगाव : मालेगाव शहारातिल बस स्थानक समस्यांच्या विळख्यात अडकले आहे .पेयजलाचा अभाव ,तुटलेले कुम्पन स्वच्छता ग्रुहाची दूरावस्था आदि समस्यांच्या विलख्यात अडकले आहे .
या बसस्थानक परिसराचे तारेचे कुम्पन तुटलेले आहे .तिथे महिला व पुरुषांच्या स्वच्छता ग्रुहाची दूरावस्था झाली आहे . प्रवाशांसाठी पेयजलाची स्वतंत्र व्यवस्था इथे नाही नगर पंचायतच्या पाणी पुरवठा विभागाच्या नळाचे पाणी येथे वापरण्यात येते . ते फिल्टर होन नसून पिण्या योग्य नसल्याने प्रवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. बसस्थानकातील पथदीवे बहुतांश वेळा बंद असतात .त्यामुळे रात्री तिथे प्रवाशांना थांबता येत नाही. बस स्थानक परिसरात कम्पाउंड लगत पथदीवे लावण्याची गरज आहे .बस स्थानक परिसराला तारेचे कूम्पन करण्याची गरज आहे . या बसस्थानकावर बरºयाच बस जात नाहीत सायंकाळी ७ वाजता नंतर तर बस एखांद्यावेळीच बस स्थानकावर जातात .काही बस तर शेलू फाटा ,किंवा जुने बस स्थानक येथूनच परत जातात .त्यामुळे नवीन बस स्थानकाजवळ राहाणाºया लोकांना जुने बसस्थानक किंवा शेलू फाटा येथुन पायी जावे लागते .सर्व बस नवीन बसस्थानकावर नेण्यात याव्यात .तश्या सूचना राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकार्यांनि एस टी च्या चालक वाहकांना द्यावयास पाहिजे .बसस्थानकावर बसेस नेण्याची प्रतिक्रीया सेवाराम आडे यांनी यावेळी व्यक्त केली.
दिवसा बस बसस्थानकवर जातात .मात्र रात्रीच्या वेळी उशिरा जाणाºया काही बस बसस्थानकावर जात नव्हत्या . त्या जाव्यात म्हणून त्याबाबत सूचना वाशिम बसस्थानकात लावण्यात आली आहे .त्याचा सकारात्मक परिणाम होत आहे. - डि . के .चंदनशिव , वाहतुक नियंत्रक.