..म्हणे एलसीबीची कारवाई
By Admin | Updated: September 20, 2014 22:15 IST2014-09-20T22:15:04+5:302014-09-20T22:15:04+5:30
वाशिम गुन्हे आन्वेशन शाखेने संशयास्पद वाहनाची केलेली तब्बल सहा तास तपासणी निष्फळ.

..म्हणे एलसीबीची कारवाई
वाशिम : आंध्रप्रदेशमधून महाराष्ट्रात गांजाची तस्करी करणार्या संशयास्पद वाहनाची एलसीबीच्या एका पथकाने २0 सप्टेंबर रोजी राजगाव नजीक तब्बल सहा तास तपासणी करून प्रकरण ह्यबुमरँगह्ण केल्याची चर्चा पोलिस विभागात चांगलीच रंगली.
वाशिम स्थानिक गुन्हे शाखेच्या एका पथकाने राजगाव नजीक दुपारी १२ वाजता एक वाहन थांबवून तपासणी केली. या वाहनाचालकाला महामार्गावर थांबवून ठेवले. मात्र, परिसरात ढाबे असल्याने या प्रकरणाची चर्चा जास्त होईल या भीतीपोटी वाहन महामार्गापासून सुकळी गावाच्या दिशेने निर्जन रस्त्यावर तब्बल सहा तास थांबवून ठेवले. एवढा वेळ या वाहनाला थांबवून ठेवल्यामुळे पोलिस नेमका या वाहनामध्ये कोणता शोध लावत होते हा प्रश्न अनाकलनीय आहे. पोलिसांच्या भितीपोटी परिसरातील नागरिक व रस्त्याने ये-जा करणारे नागरिक कानोसा घेण्याचा प्रयत्न करीत होते.
मात्र, पोलिस व वाहनचालकांमध्ये काय चालू आहे याचा कुणालाच थांगपत्ता लागू शकला नाही. गुन्हे आन्वेषन शाखेच्या सहायक पोलिक निरिक्षक आर. जी. शेख यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी वाहनाची तपासणी केल्याचे सांगीतले. मात्र त्या वाहनात काहीच आढळुण न आल्याने त्या वाहनाला सोडुन दिले असल्याचे सांगीतले.