डॉक्टरांना जेनेरिक औषधे सुचविण्याची सक्ती करा!
By Admin | Updated: May 25, 2015 02:15 IST2015-05-25T02:15:39+5:302015-05-25T02:15:39+5:30
काँग्रेस प्रवक्त्यांची केंद्राकडे मागणी.

डॉक्टरांना जेनेरिक औषधे सुचविण्याची सक्ती करा!
अकोला: शासकीय रुग्णालयात ३४८ औषधे मोफत देण्याची योजना केंद्र सरकारने आखली होती. या योजनेत बदल करून केवळ ५0 औषधे मोफत देण्याचे कारस्थान रचले जात आहे. गरीब रुग्णांवर होत असलेला अन्याय दूर करून देशभरातील सर्व रुग्णांना ३४८ औषधे मोफत द्यावीत. तसेच इतर सर्व रुग्णांना औषधे स्वस्त मिळण्यासाठी डॉक्टरांना जेनेरिक औषधेच सुचविण्याच्या बंधनाची सक्तीने अंमलबजावणी करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ता डॉ. सुधीर ढोणे यांनी केली आहे. जेनेरिक औषधांशी संबंधित विभागाचे मंत्री असलेले भारत सरकारचे रसायन व खते मंत्री हंसराज अहीर यांना भेटून डॉ. ढोणे यांनी त्यांच्याशी चर्चा केली व निवेदन दिले. निवेदनात डॉ. ढोणे यांनी म्हटले आहे, की ह्यमेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाह्णच्या २00२ च्या नियमानुसार डॉक्टरांनी शक्यतो जेनेरिक औषधेच रुग्णांना लिहून देण्याचे बंधन आहे. मात्र, औषध कंपन्या व डॉक्टरांमधील साटेलोट्यामुळे रुग्णांना स्वस्त दरातील औषधे उपलब्ध होत नाहीत. स्वस्त व दज्रेदार जेनेरिक औषधे लिहून न देणार्या डॉक्टरांची नोंदणीच रद्द करण्याची शिफारस मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाने केली आहे. त्याची सक्तीने अंमलबजावणी करावी. याशिवाय आवश्यक असलेली केवळ ३४८ औषधेच आहेत. मात्र, भारतात या घटक द्रव्यांपासून बनविलेली ६0 हजार बॅ्रन्डस नावे असलेली औषधी आहेत. ही सर्व ब्रॅन्ड नावे रद्द करून औषधांच्या वेस्टनावर केवळ जेनेरिक नावेच टाकली, तर औषधांच्या किमती खूप कमी होऊ शकतात, असे नमूद करून गरीब रुग्णांना मोफत व मध्यमवर्गीयांना स्वस्त दरात दज्रेदार औषधे उपलब्ध करून देण्यासाठी कठोर पावले उचलावीत, अशी मागणी डॉ. ढोणे यांनी हंसराज अहिर यांच्याकडे केली आहे.