मोलकरणींना अनेक दरवाजे बंद; कुटुंबाचा गाडा कसा चालणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:37 IST2021-04-14T04:37:26+5:302021-04-14T04:37:26+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम : जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून, या आठवड्यात लॉकडाऊन लागण्याची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे ...

The maids closed many doors; How will the family cart run? | मोलकरणींना अनेक दरवाजे बंद; कुटुंबाचा गाडा कसा चालणार?

मोलकरणींना अनेक दरवाजे बंद; कुटुंबाचा गाडा कसा चालणार?

लोकमत न्यूज नेटवर्क

वाशिम : जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून, या आठवड्यात लॉकडाऊन लागण्याची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे घरकाम करणाऱ्या मोलकरणींवर मोठ संकट आले असून, उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा ठाकला आहे.

जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढला आहे. दररोज सरासरी ३०० कोरोना पॉझिटिव्ह निघत आहे. तसेच अलीकडच्या काळात मृत्यूची संख्याही वाढली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीती वाढली आहे. शहरातील प्रत्येक वाॅर्डात व गल्लीत पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहेत. रुग्णसंख्या वाढत असल्याने अनेक नागरिक घरातच राहण्याला प्राधान्य देत आहेत.

तसेच आजूबाजूच्या नागरिकांशीही संपर्क साधत नसल्याचे दिसून येते. अशावेळी मोलकरणींनाही घरात न बोलावण्याचा निर्णय अनेकांनी घेतला आहे. तसेच आगामी काळात लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे मोलकरणींवर संकट ओढवले आहे. सध्या कोरोनामुळे अनेक व्यवसाय ठप्प आहेत. त्यामुळे मजुरांचा रोजगार हिरावला गेला आहे. परिणामी अनेक कुटुंबांची संपूर्ण जबाबदारी ही घरकाम करणाऱ्या महिलांवर येऊन पडली आहे. अशातच आता घरकामही बंद झाले, तर अनेक कुटुंबावर उपासमारीची वेळ येण्याची दाट शक्यता आहे. शहरात हजारावर मोलकरणींची संख्या आहे. मोलकरणींना कामासाठी एका भागातून दुसऱ्या भागात जावे लागते. सध्या शहरात विनाकारण फिरणाऱ्यांना पोलीस विचारणा करीत आहेत. त्यामुळे कामावर जाताना मोलकरणींना या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

०००

बॉक्स

एका घरातून मिळतात हजार रुपये

घरात स्वयंपाक तसेच धुणी - भांडी करण्याचे काम वेगवेगळ्या मोलकरणी करतात. स्वयंपाक करणाऱ्या मोलकरणी एकाच दिवसात वेळेचे नियोजन करून दोन ते तीन घरी काम करतात.

धुणी - भांडी करणाऱ्या मोलकरणीही तीन ते चार घरी काम करतात. एका घरातून महिन्याला ९०० ते एक हजार रुपये मिळतात. त्यामुळे एका मोलकरणीला महिन्याला चार ते पाच हजार रुपये मिळतात.

०००

कोट

मागील वर्षी लॉकडाऊनमुळे काम बंद होते. त्यातच पती व मुलेही घरीच होती. त्यामुळे आर्थिक अडचणीचा सामना करावा लागला. कुटुंबाचे पालन पोषण करताना तारेवरची कसरत करावी लागते. आता पुन्हा लॉकडाऊन लागला तर तेच दिवस येणार आहेत. मोलकरणींसाठी कठीण काळ आहे.

- पंचफुला अंभोरे

कोरोनाने अनेक क्षेत्र प्रभावित झाले. त्याचप्रमाणे गोरगरीब व मोलकरणींना देखील अनेक अडचणी निर्माण झाल्या. कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने अनेकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे कामावर येऊ नका, असे सांगितले आहे. त्यातच सध्या सर्व बंद असल्यामुळे रोजगारही हिरावला आहे. घरगाडा चालवावा कसा, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

- लता खंडारे

Web Title: The maids closed many doors; How will the family cart run?