रिसोड नगरपरिषदेच्या विषय समित्यांत महिलाराज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:37 IST2021-02-07T04:37:47+5:302021-02-07T04:37:47+5:30
रिसोड : येथील स्थानिक रिसोड नगरपरिषदेच्या विषय समिती सभापतीची निवडणूक ६ फेब्रुवारी रोजी घेण्यात आली. या प्रक्रियेत सर्व समित्यांवर ...

रिसोड नगरपरिषदेच्या विषय समित्यांत महिलाराज
रिसोड : येथील स्थानिक रिसोड नगरपरिषदेच्या विषय समिती सभापतीची निवडणूक ६ फेब्रुवारी रोजी घेण्यात आली. या प्रक्रियेत सर्व समित्यांवर महिलांची निवड करण्यात आली. केवळ एकाच ठिकाणी पुरुष सदस्याची सभापतीपदी निवड झाली.
रिसोड नगरपरिषदेच्या सभागृहात शनिवारी विषय समित्यांच्या सभापतीपदाची निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडणूक प्रक्रियेत सर्व विभागांचे सभापती हे बिनविरोध निवड झाली. यामध्ये बांधकाम सभापतीपदावर लक्ष्मी सागर क्षीरसागर, पाणीपुरवठा सभापतीपदी नारायण किसन गायकवाड, पाणीपुरवठा सभापती पदी पप्पीबाई कदम, महिला व बालकल्याण सभापतीपदी रुकसाना बी बागवान, तर या विभागाच्या उपभापतीपदी संगीता रमेश मोरे उपसभापती यांची निवड झाली. सभापतीपदाचा एक वर्षाचा कार्यकाळ संपल्यानंतर ही निवडणूक घेण्यात आली. याप्रसंगी नगरपरिषद अध्यक्ष विजयमाला आसनकर यांच्यासह रिसोड नगरपरिषदेतील सर्व गटांचे प्रमुख, सर्व सदस्य उपस्थित होते. ही निवड प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गणेश पांडे, कार्यालय अधीक्षक निहाल सत्तार, अग्नी पर्यवेक्षक गजानन मोरे, सभा अधीक्षक रितेश इरतकर, राजू नकवाल व रवि जुमडे यांनी परिश्रम घेतले.