मालेगावमध्ये तहसीलदारांना घेराव!
By Admin | Updated: February 24, 2017 02:02 IST2017-02-24T02:02:41+5:302017-02-24T02:02:41+5:30
नाफेडद्वारा तूर खरेदी सुरू करण्याच्या मागणीसाठी शेतकर्यांचे निवेदन.

मालेगावमध्ये तहसीलदारांना घेराव!
मालेगाव, दि. २३- नाफेडद्वारा तूर खरेदी सुरू करण्याच्या मागणीसाठी गुरुवार, २३ फेब्रुवारी रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वात असंख्य शेतकर्यांनी मालेगावच्या तहसीलदारांना घेराव घातला.
'नाफेड'चे तूर खरेदी केंद्र बंद झाल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले असून, बाजार समितीच्या आवारात पडून असलेली शेकडो क्विंटल तूर 'नाफेड'ने मोजून घ्यावी आणि मोबदला अदा करावा, अशी एकमुखी मागणी शेतकर्यांनी यावेळी लावून धरली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दामोदर इंगोले यांच्या नेतृत्वात यावेळी तहसीलदार रमेश जसवंत यांना निवेदन देण्यात आले. दरम्यान, तहसीलदारांनी याप्रसंगी ह्यनाफेडह्णच्या संबंधित अधिकार्यांशी चर्चा करून हा तिढा सोडविण्याची सूचना केली.