वाढत्या थकबाकीने महावितरण हैराण!
By Admin | Updated: October 24, 2016 18:03 IST2016-10-24T18:03:31+5:302016-10-24T18:03:31+5:30
जिल्हयात घरगुती, कृषीपंप, औद्योगिक, व्यावसायिक आदी स्वरूपातील ग्राहकांकडे तब्बल ३२५ कोटी रुपयांची थकबाकी असून यामुळे महावितरण हैराण झाले आहे.

वाढत्या थकबाकीने महावितरण हैराण!
>सुनील काकडे / ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि. 24 - जिल्हयात घरगुती, कृषीपंप, औद्योगिक, व्यावसायिक आदी स्वरूपातील ग्राहकांकडे तब्बल ३२५ कोटी रुपयांची थकबाकी असून यामुळे महावितरण हैराण झाले आहे. देखभाल-दुरूस्तीच्या कामांवर त्याचा विपरित परिणाम जाणवत आहे.
वाशिम जिल्ह्यात वीज वितरण कंपनीचे एकंदरित २ लाख १९ हजार ५६६ ग्राहक आहेत. माहेवारी वसूल होणाºया देयकांमधून ७० टक्के रक्कम वीज खरेदीवर खर्च केली जाते; तर उर्वरित ३० टक्के रकमेतून महावितरणला संपूर्ण प्रशासकीय खर्चासह इतर खर्च भागवावा लागतो. ग्राहकांनी ही महत्वाची बाब लक्षात घेवून त्यांच्याकडे असलेली थकबाकी विनाविलंब अदा करून महावितरणला सहकार्य केल्यास अखंडित वीजपुरवठा करणे शक्य असल्याचे कार्यकारी अभियंता अतुल देवकर यांनी सांगितले.