वीज चोरांवर कारवाईबाबत महावितरण उदासिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2017 20:09 IST2017-08-08T20:08:03+5:302017-08-08T20:09:48+5:30
वाशिम: जिल्ह्यातील १५ गावांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून वीज वाहिन्यांवर आकोडे टाकून सर्रास वीजचोरी केली जात आहे. तथापि, ही गावे कोणती आहेत, याबाबत महावितरणला पुरेपूर कल्पना असतानाही संबंधितांवर कारवाई करण्यास यंत्रणा धजावत नसल्याची स्थिती आहे. वेळेवर तथा पुरेसा पोलिस बंदोबस्त मिळत नसल्यानेच ही स्थिती उद्भवल्याची माहिती सूत्रांनी दिली.

वीज चोरांवर कारवाईबाबत महावितरण उदासिन
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: जिल्ह्यातील १५ गावांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून वीज वाहिन्यांवर आकोडे टाकून सर्रास वीजचोरी केली जात आहे. तथापि, ही गावे कोणती आहेत, याबाबत महावितरणला पुरेपूर कल्पना असतानाही संबंधितांवर कारवाई करण्यास यंत्रणा धजावत नसल्याची स्थिती आहे. वेळेवर तथा पुरेसा पोलिस बंदोबस्त मिळत नसल्यानेच ही स्थिती उद्भवल्याची माहिती सूत्रांनी दिली.
वाशिम जिल्ह्यात सर्व प्रकारांमधील (घरगुती, औद्योगिक, वाणिज्य, कृषी) महावितरणचे एकूण २ लाख २० हजार २६४ ग्राहक आहेत. त्यापैकी घरगुती वीज वापर करणाºया ग्राहकांची संख्या ४८ हजार ७६८ असून यातील सुमारे २५ टक्के ग्राहकांकडे दरमहा कोट्यवधी रुपयांची थकबाकी राहत आहे. ही रक्कम दिवसागणिक वाढतच चालली असून महावितरणला ती वसूल करणे अशक्य होत आहे. अशातच जिल्ह्यातील ठराविक काही गावांमध्ये सर्रास वाहिन्यांवर आकाडे टाकून वीज चोरी केली जात असताना त्यावरही नियंत्रण मिळविणे महावितरणला कठीण झाले.
जिल्ह्यातील १५ च्या आसपास गावांमध्ये विशेषत्वाने वीज चोरी केली जात असल्याचे महावितरणच्या पाहणीत समोर आले आहे. त्यानुषंगाने लवकरच धडक कारवाईची मोहीम हाती घेतली जाणार असून त्यासाठी तालुकानिहाय विशेष पथक नेमले जातील. नियमबाह्य पद्धतीने वीज वापरणाºया ग्राहकांनी कारवाई टाळण्यासाठी चोरीचा प्रकार बंद करावा, अशी अपेक्षा आहे.
- बी.डी.बेथारिया, अधीक्षक अभियंता, महावितरण, वाशिम