महावीर जयंती साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:37 IST2021-04-26T04:37:51+5:302021-04-26T04:37:51+5:30

दरवर्षी मोठ्या उत्साहात शिरपूर येथे दिगंबर जैन व श्वेतांबर जैन बांधवांच्यावतीने विश्वाला अहिंसेचा मार्ग दाखविणाऱ्या भगवान महावीर यांचा जन्मोत्सव ...

Mahavir Jayanti celebration | महावीर जयंती साजरी

महावीर जयंती साजरी

दरवर्षी मोठ्या उत्साहात शिरपूर येथे दिगंबर जैन व श्वेतांबर जैन बांधवांच्यावतीने विश्वाला अहिंसेचा मार्ग दाखविणाऱ्या भगवान महावीर यांचा जन्मोत्सव कल्याणक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मागील वर्षापासून सर्व धार्मिक उत्सव कोरोनासंसर्ग आजारामुळे रद्द करावे लागले. सध्या जिल्हाभरात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित रुग्ण असल्याने सगळेच धार्मिक कार्यक्रम उत्सव रद्द करावे लागले आहेत. कोरोना पार्श्वभूमीवर २५ एप्रिल रोजी भगवान महावीर जयंतीनिमित्त दिगंबर व श्वेतांबर जैन संस्थानमध्ये अतिशय साध्या पद्धतीने भगवान महावीर यांचा जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला. तत्पूर्वी संस्थानच्या वतीने शिरपूर येथील मंदिरामध्ये भाविकांनी गर्दी करू नये तसेच भगवान महावीर यांची आराधना पूजन घरीच करावे, असे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत भाविकांनी साध्या पद्धतीने जयंती साजरी केली.

Web Title: Mahavir Jayanti celebration