महात्मा फुले उद्यानाची दुरवस्था
By Admin | Updated: May 25, 2014 00:12 IST2014-05-24T22:02:02+5:302014-05-25T00:12:53+5:30
वाशिम शहरातील महात्मा फुले उद्यानाचे सौंदर्य नष्ट होवून सदर उद्यानाची दुरावस्था झाली आहे.

महात्मा फुले उद्यानाची दुरवस्था
महात्मा फुले उद्यानाची दुरावस्था वाशिम : शहरातील महात्माफुले चौकमध्ये असलेल्या महात्मा फुले उद्यानाचे सौंदर्य नष्ट होवून सदर उद्यानाची दुरावस्था झाली आहे. परिणामी परिसरातील नागरिकांना व लहान बालकाना बगिच्याच्या सुविधेला मुकावे लागत आहे. वाशिम नगर परिषदेने तत्कालीन नगराध्यक्ष दिपकराव भांदुर्गे यांच्या कार्यकाळात महात्मा फुले चौकात महात्मा फुले उद्यान विकसित केले होते. मात्र उद्यानाकडे नगरपालीकेचे दुर्लक्ष होवून सदर उद्यानाने दुरावस्थेचा कळस गाठला आहे. सध्या या उद्यानातील झाडे व फुलझाडे वाळल्याने नष्ट झाली आहेत तर उद्यानातील मनोरंजनाचे साहित्य,घसरगुंडी व अन्य खेळणी चोरटयांनी लंपास केली आहेत. उद्यानाची देखभाल व दुरूस्ती नसल्याने आज शहरातील जवळपास लक्ष देणे गरजेचे आहे. शहरातील सर्वच उद्याने भकास झाली आहेत. उद्याने भकास झाल्याने संध्याकाळी विरंगुळयाकरीता नागरिकांना कोणतीच जागा उपलब्ध नाही. शहर दिवसेंदिसव वाढत असतांना उद्यानाची शहरात अत्यंत आवश्यकता आहे. त्या अनुषंगाने संबधितांनी पुढाकार घेणे गरजेचे झाले आहे.