महात्मा फुले भाजीमार्केट समस्यांच्या गर्तेत

By Admin | Updated: May 15, 2014 22:48 IST2014-05-15T22:01:12+5:302014-05-15T22:48:32+5:30

वाशिम येथिल महात्मा फुले संकुलाची दुरावस्था झाली आहे.

Mahatma Phule Bhajyagarket Ghatte Ghatte | महात्मा फुले भाजीमार्केट समस्यांच्या गर्तेत

महात्मा फुले भाजीमार्केट समस्यांच्या गर्तेत

वाशिम : नगरपरिषदेच्या वतिने शहराच्या मुख्यजागी बिओटी तत्वावर बांधण्यात आलेल्या महात्मा फुले संकुलाची आजच्या घडीला दुरावस्था झाली आहे. नगरपरिषदेला व्यापारी संकुलातील दुकानदारांकडून भाडे मिळत असते. त्यातील काही रक्कम या संकुलाच्या देखरेखीसाठी नियोजिज असते. मात्र याचा काही फायदा होताना दिसून येत नाही. त्याचप्रमाणे भाजीमार्केट समस्यांच्या गर्तेत अडकले आहे. या संकुलात गुरे ढोरे, वराह मुक्तपणे संचार करताना दिसून येतात. संकुलात भाजीपाला विक्रेत्यांकरीता गाळे तयार करण्यात आले आहेत. मात्र भाजीविक्रेते गाळयात न बसता उघडयावरच आपली दुकाने मांडत असल्याचे चित्र आहे. या परिसरातील काही नागरिक शौचास करीत असल्याने सर्वत्र दुर्गंधीचा फैलाव निर्माण झाला आहे. यासर्व बाबीचा फटका मात्र येथे व्यवसाय करणार्‍या व्यावसायिकांना सहन करावा लागत आहे. या संदर्भात व्यावसायिकांनी लोकप्रतिनिधी, संबधित सर्वांना निवेदने देवून आपल्याला होत असलेल्या त्रासाची जाणीव करून दिली मात्र याकडे कुणीही लक्ष देण्यास तयार नाही. लघु उद्योगासाठी लाखो रूपये खर्च करून आपली दुकाने मांडणार्‍या लघुव्यावसायिकांना या सर्व समस्यांमुळे डोकेदुखी निर्माण झाली आहे. संकुलातील बर्‍याच लघु व्यावसायिकांनी आपली दुकाने हलवून दुसरीकडे आपला व्यवसाय थाटला आहे. काही जण येथेच असून तेही त्याच मनस्थितीत असल्याने संबधितांनी लक्ष देवून या संकुलाची स्वच्छता करावी व या संकुलाला भयाण होण्यापासून वाचविण्याची मागणी लघु व्यावसायिकांतून केल्या जात आहे.

Web Title: Mahatma Phule Bhajyagarket Ghatte Ghatte

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.