महात्मा बसवेश्वर जयंती घरोघरी साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:42 IST2021-05-18T04:42:54+5:302021-05-18T04:42:54+5:30
वीरशैव - लिंगायत समाजाची प्रबळ व प्रमुख संघटना असलेल्या शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय ...

महात्मा बसवेश्वर जयंती घरोघरी साजरी
वीरशैव - लिंगायत समाजाची प्रबळ व प्रमुख संघटना असलेल्या शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. मनोहर धोंडे यांनी देशावर आलेल्या कोरोना संकटामुळे सलग दुसऱ्या वर्षी महात्मा बसवेश्वर जयंती सार्वजनिक स्वरूपात साजरी न करता वीरशैव लिंगायत समाज बांधव व महात्मा बसवेश्वरप्रेमींनी जयंती घरोघरी साजरी करण्याचे आवाहन केले होते. प्रा. धोंडे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्ह्यात वाशिम, रिसोड, कारंजा लाड, मंगरुळपीर, मानोरा, मालेगाव या शहरांसह ग्रामीण भागात काटा, शिरपूर जैन, पेनबोरी, सनगाव, भर जहाँगीर, ब्रह्मा, पिंपळगाव, मोहरी, कवठळ, केकतउमरा आदीं गावांमध्ये जयंती मोठ्या उत्साहात घरोघरी साजरी करण्यात आली.
तालुक्यातील ब्रह्मा येथील मनीषआप्पा मखमले यांच्या घरी महात्मा बसवेश्वर जयंती घरगुती स्वरूपात साजरी केली. महात्मा बसवेश्वर प्रतिमेसोबत सध्याच्या कोरोना संकटावर जनतेने घ्यावयाच्या काळजीबाबत व पर्यावरणावरील संदेशाचे सादरीकरण करण्यात आले. या संदेशाद्वारे प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले होते. जयंती व संदेश उपक्रमाचे जिल्ह्यात सर्वत्र कौतुक होत आहे.