महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हाध्यक्षांसह पदाधिका-यांचा राजीनामा
By Admin | Updated: March 19, 2015 01:34 IST2015-03-19T01:34:03+5:302015-03-19T01:34:03+5:30
वाशिम जिल्ह्यातील राजकारणात खळबळ.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हाध्यक्षांसह पदाधिका-यांचा राजीनामा
वाशिम : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जिल्हाध्यक्षासह ३0 पदाधिकार्यांनी एकाच दिवशी राजीनामा दिल्याने राजकीय वतरुळात खळबळ उडाली आहे. एकाच वेळी एवढय़ा पदाधिकार्यांनी राजीनामा देण्याबाबत उलट-सुलट चर्चा होत आहे. वाशिम येथील जिजाऊ सभागृहामध्ये १८ मार्चला मनसेच्यावतीने चिंतन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत सर्वांनी जिल्हाध्यक्षांकडे राजीनामा सादर केला व तो त्यांनी स्वीकृत केला; तसेच जिल्हाध्यक्ष यांनीसुद्धा पदाधिकार्यांच्या कारणाशी सहमत होऊन आपला राजीनामा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे पाठविला. स्थानिक जिजाऊ सभागृहामध्ये १८ मार्चला मनसेची चिंतन बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला जिल्हय़ातील बहुतांश पदाधिकारी, विविध सेलचे पदाधिकारी, शाखा प्रमुख व पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते. बैठक सुरू झाल्यानंतर उपस्थित पदाधिकारी यांनी गत ९ वर्षात पक्षाच्या ध्येयधोरणामध्ये ग्रामीण महाराष्ट्राबाबत विशेष करून विदर्भाच्या सिंचनाबाबत, शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी, विदर्भाचा सर्वांगीण विकास याबाबत कुठलेही ठोस धोरणात्मक निर्णय घेतले नाहीत. पक्ष हा केवळ मोठय़ा शहरांच्या संबंधितच विचार करीत असून, ग्रामीण महाराष्ट्राबाबत अक्षम्य उदासीन असल्याचे बोलून यापुढे पक्षामध्ये काम करण्याची इच्छा नसल्याचे जिल्हाध्यक्षांना सांगितले. जिल्हाध्यक्ष राजू पाटील राजे यांनी सर्व पदाधिकार्यांचे म्हणणे ऐकून लेखी सुचित करण्याचे सांगितले. उपस्थित पदाधिकारी यांनी लेखी राजीनामा देऊन पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्व रद्द करण्याच्या निवेदनावरून जिल्हाध्यक्ष यांनी सवार्ंचे राजीनामे स्वीकारले. यावेळी राजे यांनी पदाधिकार्यांना पक्षात काम करण्याची विनंती केली असता, पदाधिकार्यांनी नकार दिला; तसेच पदाधिकारी यांनी दिलेल्या राजीनाम्याच्या कारणाचा विचार करता जिल्हाध्यक्ष म्हणून पदाधिकार्यांच्या बोलण्यात तथ्य असल्याचे म्हणून जिल्हाध्यक्ष यांनीसुद्धा आपला राजीनामा पाठविला. एकाच वेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जिल्हाध्यक्षासह पदाधिकार्यांनी राजीनामा दिल्याची जिल्हय़ातील राजकारणातील ही पहिली घटना असल्याचे म्हटल्या जात आहे.