शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

Maharasahtra Bandh: विदर्भातही बंदला शंभर टक्के प्रतिसाद, पेट्रोल पंपांनाही टाळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2018 15:17 IST

Maharashtra Bandh: विदर्भातील वाशिम जिल्ह्यात मराठा आरक्षणावरुन सरकारचा निषेध करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर क्रांती दिनी मराठा आंदोलकांनी बंद पाळला आहे.

रिसोड  (वाशीम): वाशिम जिल्ह्यात मराठा आरक्षणावरुन सरकारचा निषेध नोंदविण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर क्रांती दिनी मराठा क्रांती मोर्चा आंदोलकांनी बंद पाळला आहे. या बंदला जिल्ह्यातून उत्स्फुर्त प्रतिसाद देण्यात आला. व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवली आहेत. तर पेट्रोल पंपधारकांनीही पेट्रोल पंपावर टाळे लावले आहे. मराठा आंदोलक मोठ्या संख्येने या बंदमध्ये सहभागी झाले आहेत. 

जिल्ह्यातील रिसोड येथे बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. सकाळी जिजाऊ चौकातून सकल मराठा समाज बांधवांच्यावतीने शहरात मोटारसायकल रॅली काढून बंदचे आवाहन करण्यात आले. याला संपूर्ण व्यावसायिकांनी आपला पाठिंबा दर्शवत दुकाने बंद ठेवली. रॅलीचे मोठे रूप पाहून रिसोड पोलिसांनी आपला ताफा वाढविला होता. बंद काळात दवाखाने व मेडिकल वगळता संपूर्ण बाजारपेठ शंभर टक्के बंद असल्याचे दिसून आले. याप्रसंगी सकल मराठा समाज बांधवांच्यावतीने वाशिम नाका येथे ठिय्या आंदोलन करताना सकल मराठा समाज बांधवांचे कार्यकर्ते दिसून आले. तर अनेक मराठा समाज बांधवांनी आपले मुंडन करुन शासनाप्रती निषेध नोंदविला. तालुक्यातील अनेक ग्रामीण भागांमध्ये बंदचे पडसाद दिसून आले. गोवर्धन, मोठेगाव, वाकद, भर जहागीर, लहेणी या गावात लोकांनी टायर जाळून रस्त्यावर ठिय्या आंदोलन केले. तर लोणी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रेतयात्रा काढून लोणी येथील रस्त्यावर दफन करण्यात आले. यावेळी रिसोड पोलीसचे ठाणेदार राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रिसोड पोलिसांनी मोलाची भूमिका बजावली.

खामगावातही बंदसकल मराठा समाजातर्फ गुरुवारी पुकारण्यात आलेल्या बंदला खामगावकरांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. शहरातील सर्वच दुकाने, प्रतिष्ठाने बंद ठेवण्यात आली होती. शहरात कुठेही अनुचीत प्रकार घडला नाही. ‘खुप लढलो मातीसाठी, आता लढाई आरक्षणासाठी’ व ‘एक मराठा लाख मराठा’ अशा प्रकारच्या घोषणांनी शहर दणाणून गेले होते. ‘एक मराठा लाख मराठा’च्या गगनभेदी घोषणा देण्यात आल्या. 

शेगावातही बंद सकल मराठा आंदोलनाअंतर्गत आज शहर व ग्रामीण भागात सकाळपासून कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. सकाळी 6 वाजतापासून अत्यावश्यक  सेवा वगळता व्यापारी प्रतिष्ठाने, हॉटेल, शाळा महाविद्यालय, एसटी बसेस, बंद असल्याने सर्वत्र शुकशुकाट होता. शहरातील चौकात मराठ्यांनी रास्ता रोको केला. सकल मराठा समाजातील विविध संघटना तसेच व्यापारी, अधिकारी, पतसंस्था, बँका, वकील, डॉक्टर, शिक्षक, पत्रकार हेही बंदमध्ये  सहभागी झाले होते.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणMaharashtra Bandhमहाराष्ट्र बंदwashimवाशिमMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चा