महाराणा प्रताप जयंती साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:54 IST2021-06-16T04:54:17+5:302021-06-16T04:54:17+5:30

संस्थेचे अध्यक्ष उदयसिंहजी ठाकूर व बबनसिंह बैस यांनी दीप प्रज्वलन करून राणाजींच्या प्रतिमेला माल्यार्पण केले. दरम्यान, राणाजींच्या जयंतीनिमित्त ...

Maharana Pratap Jayanti celebration | महाराणा प्रताप जयंती साजरी

महाराणा प्रताप जयंती साजरी

संस्थेचे अध्यक्ष उदयसिंहजी ठाकूर व बबनसिंह बैस यांनी दीप प्रज्वलन करून राणाजींच्या प्रतिमेला माल्यार्पण केले. दरम्यान, राणाजींच्या जयंतीनिमित्त जमा झालेल्या निधीचा उपयोग कोरोनाच्या संकटामुळे अनेक बालक अनाथ झाली आहेत. कोरोनामुळे कुणाची आई किंवा वडील गेले आहेत. तर काही बालकांचे आई-वडील दोघांचेही निधन झाले आहे. अशा विद्यार्थ्यांना मदत करण्याचे या कार्यक्रमात संस्थेच्यावतीने सर्वानुमते ठरविण्यात आले. यावेळी समाजबांधवांना मार्गदर्शन करताना प्रा. कैलाससिंह राजपूत यांनी समाजबांधवांनी संघटित व शिक्षित होण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाला प्रा. कैलाससिंह राजपूत, बबनसिंह बैस, उदयसिंह सूर्यवंशी, अशोक बैस, परेशसिंह ठाकूर, सौरभसिंह तोमर, अनिलसिंह बैस व संस्था पदाधिकारी तसेच बहुसंख्य समाजबांधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सेवानिवृत्त मुख्याध्यापक उदयसिंह ठाकूर यांनी केले तर आभार डॉ. स्वप्निल ठाकूर यांनी मानले.

Web Title: Maharana Pratap Jayanti celebration