मंगरुळपीर येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:41 IST2021-01-25T04:41:01+5:302021-01-25T04:41:01+5:30

या शिबिराचे उदघाटन शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेश मापारी, नगराध्यक्ष डॉ. गझाला यास्मिन खान, माजी नगराध्यक्ष चंदूभाऊ परळीकर, डॉ. चंद्रकांत राठी, ...

Mahaarogya Shibir at Mangrulpeer in high spirits | मंगरुळपीर येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात

मंगरुळपीर येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात

या शिबिराचे उदघाटन शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेश मापारी, नगराध्यक्ष डॉ. गझाला यास्मिन खान, माजी नगराध्यक्ष चंदूभाऊ परळीकर, डॉ. चंद्रकांत राठी, अशोक परळीकर यांच्या उपस्थितीत करण्यात आले. या शिबिरात मोफत नेत्र तपासणी व चष्मे वाटप, नेत्ररोग, स्त्रीरोग, त्वचारोग, हृदयरोग, अस्थिरोगासह विविध आजारांचे तज्ज्ञ यांनी यावेळी उपस्थित राहून रुग्णांची तपासणी केली. या शिबिरात जवळपास सहा हजार रुग्णांनी शिबिरात तपासणी करून घेतली. या शिबिरात चार हजार रुग्णांना चष्म्यांचे वितरण करण्यात आले. यशस्वीतेसाठी वाशिम विधानसभेसह संपर्क प्रमुख विवेक नाकाडे, तालुका प्रमुख रामदास सुर्वे, शहर प्रमुख सचिन परळीकर, जुबेर मोहनावाले, सोनू जयस्वाल, महेंद्र ठाकरे, ग्यानू भडांगे, सुनील कुर्वे, तसेच मंगरुळपीर तालुका, शहर व युवासेनेच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Web Title: Mahaarogya Shibir at Mangrulpeer in high spirits