महा ई-सेवा केंद्राचा वेग मंदावला

By Admin | Updated: August 1, 2014 02:19 IST2014-08-01T02:09:20+5:302014-08-01T02:19:40+5:30

वाशिम जिल्हय़ात सातबारासाठी शेतकर्‍यांच्या रांगा.

Maha e-service center slowed down | महा ई-सेवा केंद्राचा वेग मंदावला

महा ई-सेवा केंद्राचा वेग मंदावला

वाशिम : शासकीय यंत्रणेवरील ह्यताणह्ण कमी करण्याबरोबरच विविध प्रकारचे दाखले, प्रमाणपत्र, प्रतिज्ञालेख नागरिकांना तातडीने मिळण्याची सुविधा म्हणून शासनाने जिल्हा ते गाव पातळीवर महा ई-सेवा केंद्राचा ह्यसेतुह्ण निर्माण केला आहे; मात्र या केंद्रातील ऑनलाईनचे सॉफ्टवेअर मंद गतीने चालत असल्याने शेतकर्‍यांना एका सातबार्‍यासाठी तास-न-तास हेलपाटे घ्यावे लागत आहेत. जिल्हय़ातील सर्व महा ई-सेवा केंद्राची ही परिस्थिती असून, यासंदर्भात संबंधित अधिकार्‍यांशी चर्चा केली असता, ही अडचण संपूर्ण महाराष्ट्रातच असल्याचे त्यांनी सांगितले.
खरीप पीकविमा योजनेची अंतिम मुदत ३१ जुलै होती. यामध्ये वाढ करण्यात आली, याची कल्पना जिल्हय़ातील बर्‍याच शेतकर्‍यांना नसल्याने सकाळपासूनच महा ई-सेवा केंद्रावर मोठय़ा प्रमाणात शेतकर्‍यांनी गर्दी केली. शेतकर्‍यांच्या केंद्रासमोर अक्षरश: लांबच्या लांब रांगा लागल्यात; मात्र लागलेल्या रांगा पुढे सरकत नाहीत म्हणून शेतकरी वैतागून आरडाओरड करू लागले. त्यावेळी अनेक केंद्रांवरील कर्मचार्‍याने शेतकर्‍यांना ह्यसर्व्हरच स्लो आहे तर आम्ही का हाताने फिरवावेह्ण, असे सांगितले. हीच परिस्थिती जिल्हय़ातील प्रत्येक केंद्रावर असल्याचे आमच्या प्रतिनिधीने केलेल्या पाहणीवरून लक्षात आले.
शासनाने शेतकर्‍यांच्या पिकांसाठी राष्ट्रीय कृषी पीकविमा योजना आणली. नैसर्गिक आपत्तीमुळे होणारी नुकसान भरपाई वैयक्तिक स्तरावर निश्‍चित करण्यासाठी खरीप २0१४ हंगामात सर्व विमा अधिसुचित क्षेत्रात लागू करण्यात आली आहे. अल्प, अत्यल्प शेतकर्‍यांना विमा हप्तामध्ये ५0 टक्के सवलत असून, कापूस पिकासाठी विमा हप्त्यामध्ये अल्प-अत्यल्प भूधारकासाठी ७५ टक्के सवलत आहे. इतर भूधारकांसाठी ५0 टक्के सवलत देण्यात आली आहे. खरीप हंगामात विमा काढण्याची अंतिम मुदत ३१ जुलै २0१४ होती. आता सदर मुदत १६ ऑगस्ट २0१४ पर्यंत वाढविण्यात आली आहे; पण याबाबत बर्‍याच जणांना कल्पना नसल्याने गर्दीत वाढ झाली होती; तसेच याबाबत अनेक जण अनभिज्ञ दिसून आले.
वाशिम जिल्हय़ातील मालेगाव, शिरपूर, कारंजा, मंगरूळपीर, मानोरा, रिसोड, शेलुबाजारसह वाशिम शहरातील महा ई-सेवा केंद्रावर काम झपाट्याने होत नसल्याने सर्वच शेतकरी त्रस्त झाले आहेत; मात्र याकडे कुणाचेही लक्ष दिसून येत नाही. या प्रकारामुळे अनेक ठिकाणी केंद्राच्या संचालक व नागरिकांचे मोठय़ा प्रमाणात वाद होत आहेत. मालेगाव शहरात असलेल्या प्रत्येक महा ई-सेवा केंद्रावर चिक्कार गर्दी दिसून आली.
वाशिम तालुक्याचे तहसीलदार आशीष बिजवल यांनी सर्व्हर मंदगतीने चालत असल्याने शेतकर्‍यांना एका सातबारासाठी तास न तास उभे रहावे लागत असल्याचे सांगीतले. संबंधित समन्वयकाशी चर्चा करतो व सदर अडचण दूर करण्याचा प्रयत्न करण्याचे आश्‍वासन त्यांनी दिले.

Web Title: Maha e-service center slowed down

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.