मेडशीच्या वृध्द शेतक-याने मागीतली इच्छामरणाची परवानगी!

By Admin | Updated: November 30, 2014 00:23 IST2014-11-29T22:33:14+5:302014-11-30T00:23:29+5:30

शेतकरी म्हणतो, ‘प्रकल्पग्रस्त नव्हे, शासनग्रस्त!’

Madhesi's old farmer wants to marry! | मेडशीच्या वृध्द शेतक-याने मागीतली इच्छामरणाची परवानगी!

मेडशीच्या वृध्द शेतक-याने मागीतली इच्छामरणाची परवानगी!

वाशिम: राज्यावर दुष्काळाची छाया अधीक गडद होत असतानाच, मालेगाव तालुक्यातील एका ७३ वर्षीय वृध्द शेतकर्‍याने जिल्हा प्रशासनाकडे निवेदन सादर करुन इच्छामरणाची परवानगी मागितल्याने एकच खळबळ उडाली आहे.
आपली शेतजमीन शासनाला प्रकल्पासाठी दिल्यापासून आजतागायत न्यायालयाच्या पायरीशिवाय पदरात काहीच पडले नाही, अशी फिर्यादच मेडशीच्या श्रीराम सकरु राठोड यांनी मांडली त्यांच्या निवेदनाच्या माध्यमातून आहे.
प्रकल्पासाठी जमीन दिली. त्यामुळे प्रकल्पग्रस्त म्हणून संबोधल्या जाते. प्रत्यक्षात आपण प्रकल्पग्रस्त नसून, शासनग्रस्त आहोत, असे श्रीराम राठोड यांनी म्हटले आहे. राज्यात आजवर अनेकदा सत्तांतर झाले. अनेक लोक मंत्री, मुख्यमंत्री झाले; परंतू प्रकल्पग्रस्तांच्या समस्या आजही कायम आहेत. प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न न्यायोचीत मार्गाने व प्राधान्याने कधीच सोडविल्या गेला नाही. उदरनिर्वाहाचे साधन असलेली शेतजमीन प्रकल्पासाठी दिल्यानंतर, मोबदल्यासाठी न्यायालयाची पायरी चढण्याशिवाय पर्याय नाही. कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचे साधन देऊन, आपल्या पदरात न्यायालयाच्या पायरीशिवाय मिळते काय, असा उद्विग्न करणारा सवाल श्रीराम राठोड यांनी उपस्थित केला आहे.
आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचे साधन असलेली वडिलोपार्जीत जमीन आपण प्रकल्पासाठी दिली. बदल्यात न्यायालयाच्या पायरीशिवाय आपल्याला काहीच मिळाले नाही. आता वृध्दापकाळात न्यायालयाची पायरी चढणे शक्य होत नसल्याने, आपल्याला इच्छामरणाची परवानगी द्यावी, अशी मागणी राठोड यांनी वाशिमचे जिल्हाधिकारी रामचंद्र कुळकर्णी यांना २६ नोव्हेंबर रोजी दिलेल्या निवेदनातून केली आहे. श्रीराम सकरु राठोड यांच्या निवेदनामुळे प्रकल्पांसाठी जमीन संपादित केल्या गेलेल्या शेतकर्‍यांची व्यथा अधोरेखीत झाली आहे.

Web Title: Madhesi's old farmer wants to marry!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.