शहरं
Join us  
Trending Stories
1
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
6
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
7
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
8
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
9
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
10
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
11
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
12
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
13
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
14
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
15
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
16
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
17
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
18
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
19
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

मातीच्या ढिगाऱ्यावरून लक्झरी, दुचाकी घसरली; दोन ठार, पाच जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2020 2:07 PM

मातीच्या ढिगाऱ्यावरून लक्झरी,दुचाकी घसरली;दोन ठार,पाचजखमी

लोकमत न्यूज नेटवर्क कामरगाव(वाशिम): रस्त्याच्या मधोमध टाकलेल्या मातीच्या ढिगाºयावरून घसरून लक्झरी बस उलटून, त्यात एक ठार व पाच जण गंभीर झाले. यानंतर काही वेळाने याच ठिकाणी दुचाकी घसरून आणखी एक जण ठार झाला. हे अपघातकारंजा-अमरावती या राष्ट्रीय महामार्गावर कामरगावनजीक टाकळी फाट्यापासून काही अंतरावर २९ सप्टेंबर रोजी सकाळी ३ ते ४ वाजताच्या सुमारास घडले. गेल्या काही महिन्यांपासून कारंजा-अमरावती या राष्ट्रीय महामार्गाचे काम करण्यात येत आहे. या रस्त्याच्या कडा भरण्यासाठी कंत्राटदाराने टाकळी फाट्यापासून काही अंतरावर रस्त्याच्या मधोमध मातीचा ढिग टाकला होता. अशात मंगळवारी सकाळी ३ वाजताच्या सुमारास औरंगाबाद येथून प्रवासी घेऊन निघालेली एमएच २८, ईएल ४१०० क्रमांकाची लक्झरी बस या मार्गाने नागपूरकडे जात असताना टाकळी फाट्यापासून काही अंतरावर रस्त्यावर असलेल्या मातीच्या ढिगाºयावरून ही लक्झरी घसरून रस्त्याच्या कडेला उलटली. त्यात लक्झरीचा क्लीनर अमोल जोगेश खंडारे (२१) रा. नागपूर हा ठार झाला, तर चेतना रमेश भगत, प्रशांत चैनलाल काळे, संदिप विनोद टेकाम, सीमा नितीन गवई व चेतना नितीन गवई, हे पाचजण गंभीर जखमी झाले. त्यानंतर थोड्याच वेळाने पंढरपूरकडून अमतरावतीकडे जात असलेली एमएच-२७, एटी ५७०३ क्रमांकाची दुचाकीही या मातीच्या ढिगाºयावरून घसरल्याने दुचाकीवर मागे बसलेले प्रभाकर चंद्रभान वाघ (५०) रा. शेंदुरजना खु. ता. धामणगाव हे खाली पडल्याने त्यांचाही मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच धनज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला व जखमींना प्राथमिक उपचारासाठी कामरगाव ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. घटनेचा अधिक तपास धनजचे ठाणेदार अनिल ठाकरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक कपिल मस्के, स.पो. उपनिरीक्षक गजानन कदम,जमादार राजगुरे करीत आहेत.
टॅग्स :washimवाशिमKaranjaकारंजाAccidentअपघात