घराचे कुलूप तोडून १.२५ लाखाचा ऐवज लंपास!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 12:54 AM2017-08-19T00:54:05+5:302017-08-19T00:55:57+5:30

वाशिम: शहरातील ड्रिमलँड सिटीमधील बंडू गांजरे यांच्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सव्वालाखाचा ऐवज लंपास केल्याची घटना गुरुवारीच्या रात्रीदरम्यान घडली.

Lump of the house lock of 1.25 lakh! | घराचे कुलूप तोडून १.२५ लाखाचा ऐवज लंपास!

घराचे कुलूप तोडून १.२५ लाखाचा ऐवज लंपास!

googlenewsNext
ठळक मुद्देड्रिमलँड सिटीमधील घटनाचोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून सव्वालाखाचा ऐवज लंपास केला

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: शहरातील ड्रिमलँड सिटीमधील बंडू गांजरे यांच्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सव्वालाखाचा ऐवज लंपास केल्याची घटना गुरुवारीच्या रात्रीदरम्यान घडली.
ड्रिमलँड सिटीमधे वास्तव्य करणारे बंडू गांजरे हे आपल्या परिवारासह पंढरपूर-तुळजापूरला देवदर्शनासाठी गेले होते. शुक्रवारी पहाटे ३ वाजता घरी पोहोचले असता, त्यांना घराचा दरवाजा उघडा आढळून आला. घरामध्ये प्रवेश केला असता, घरातील कपाटामधे असलेले ९0 हजार रुपयांचे  दागिने व रोख ३५ हजार असा एकूण १ लाख २५  हजारांचा ऐवज अज्ञात चोरट्याने लंपास केल्याचे आढळून आले. 
दरम्यान, या घटनेची माहिती गांजरे यांनी वाशिम शहर पोलीस स्टेशनला दिली. त्यावरून शुक्रवारी सकाळच्या सुमारास पोलीस उपनिरीक्षक मस्के यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

बिट मार्शल नावालाच!
अलीकडच्या काळात शहरात बिट मार्शलसाठी नेमलेले कर्मचारी रात्रीच्या वेळी दांडी मारत असल्याचे दिसून येते. यामुळे चोरट्यांची हिंमत वाढली आहे. पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी शहरातील बिट मार्शल कार्यप्रणालीवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक झाले आहे.

Web Title: Lump of the house lock of 1.25 lakh!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.