शिरपूर येथे दुध उत्पादकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:40 IST2021-03-25T04:40:01+5:302021-03-25T04:40:01+5:30

............. जऊळका परिसरात पिकांचे अतोनात नुकसान वाशिम : जऊळका रेल्वे गाव परिसरात १९ ते २१ मार्चदरम्यान अवकाळी पाऊस आणि ...

Loss of milk producers at Shirpur | शिरपूर येथे दुध उत्पादकांचे नुकसान

शिरपूर येथे दुध उत्पादकांचे नुकसान

.............

जऊळका परिसरात पिकांचे अतोनात नुकसान

वाशिम : जऊळका रेल्वे गाव परिसरात १९ ते २१ मार्चदरम्यान अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली. यामुळे विशेषत: कांदा, फळपिके व भाजीपालावर्गीय पिकांचे अतोनात नुकसान झाले. शासनाने नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे.

.....................

मेडशी येथे दक्षता घेण्याचे आवाहन

वाशिम : वाशिम-अकोला महामार्गावर वसलेल्या मेडशी येथे गेल्या काही दिवसांमध्ये कोरोना बाधित रुग्ण वाढले आहेत. हे पाहता नागरिकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

...............

किन्हीराजा येथे पोलिसांकडून कारवाई

वाशिम : किन्हीराजा-मालेगाव मार्गावर पोलिसांनी बुधवारी नियमांचे उल्लंघन करणारे वाहनचालक व तोंडाला मास्क न लावता फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली. नियम पाळण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.

................

मालेगाव बसस्थानक घाणीच्या विळख्यात

वाशिम : तालुका मुख्यालय असलेल्या मालेगाव येथे काही वर्षांपूर्वी बसस्थानक उभारण्यात आले; मात्र अद्याप सुविधा उपलब्ध झालेल्या नाहीत. विशेषत: मुत्रीघरात सदोदित घाण पसरलेली राहत असल्याने प्रवासी वैतागले आहेत.

Web Title: Loss of milk producers at Shirpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.