‘चिलिंग चार्जेस’च्या नावाखाली ग्राहकांची लूट!
By Admin | Updated: May 1, 2016 01:01 IST2016-05-01T01:01:44+5:302016-05-01T01:01:44+5:30
अन्न व औषधी प्रशासन विभागाचे दुर्लक्ष.

‘चिलिंग चार्जेस’च्या नावाखाली ग्राहकांची लूट!
कारंजा लाड: जिवाची लाहीलाही करणार्या उन्हात घशाची कोरड मिटविण्यासाठी शीतपेय आणि बाटलीबंद पाणी पिणार्या ग्राहकांकडून चिलिंग चाज्रेसच्या नावाखाली शहरातील काही ठिकाणी वारेमाप किंमत आकारून लूट करण्यात येत असतानाही अन्न व औषधी प्रशासन विभागाचे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे. मागील तीन वर्षांपासून पावसाचे प्रमाण कमी झाल्याने जमिनीतील पाणी पातळी खोल गेली आणि सर्वच ठिकाणचे जलाशय कोरडे ठण पडत असल्याने पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाले असताना मानव धर्माचे पालन करून जनसामान्यांची तहान भागविण्याऐवजी काही शीतपेय आणि बाटलीबंद पाण्याची विक्री करणार्यांकडून या स्थितीचा फायदा घेऊन ग्राहकांची लूट करण्यात येत असल्याचे दिसत आहे. यावर्षी उन्हाने कहर केला असून, ४४ अंशाचा पारा गाठलेल्या उन्हामुळे अंग भाजून निघत आहे. अखंड वाहणार्या घामाच्या धारांमुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्याने घशाला कोरड पडत आहे. घशाची हीच कोरड शमविण्यासाठी लोक शीतपेय किंवा बाटलीबंद पाण्याचा आधार घेत आहेत. त्यामुळे सहाजिकच शीतपेयांची मागणी वाढली आहे. याचा फायदा शीतपेय विक्रेते उचलत आहेत. प्रत्यक्ष छापील किंमत आणि ग्राहकांकडून घेण्यात येणारी किंमत यात ५ ते ६ रुपयांचा फरक दिसत आहे. काही ठिकाणी या पेक्षा अधिक घेतले जातात. या विषयी ग्राहकांकडून विचारणा झाली तर चिलिंग चाज्रेेंस असल्याचे शीत पेय विक्रेत्यांकडून सांगण्यात येते. उन्हाळ्यात वीज जास्त लागते त्यामुळे वीज बिलही जास्त येते. हा अ ितरिक्त चार्ज कंपनी देत नाही. म्हणून चिलिंग चार्जेस लावले जात असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. वास् तविक कंपनीकडून सर्व खर्च व कमिशनसह वस्तूंची किंमत ठरवलेली असते. छापील किमतीपेक्षा जास्त रक्कम ग्राहकांकडून घेऊ नये यासाठी वजनमापे नियंत्रण विभागाकडे नियम मोडणार्यांवर कारवाई करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मूळ किमतीपेक्षा जादा दराने विक्री करणे हे बेकायदेशीर ठरवून कायदेभंग करणार्यांना दोन ते पाच हजार दंडाची शिक्षा व न्यायालयात केस दाखल होऊ शकते