वाशिम जिल्हा कारागृहातील हालचालींवर ‘सीसी’ कॅमेर्‍याची नजर

By Admin | Updated: April 7, 2015 02:07 IST2015-04-07T02:07:55+5:302015-04-07T02:07:55+5:30

डीपीडीसीमधून निधीची तरतूद; सौरऊर्जेची उपकरणे कार्यान्वित.

The look of 'CC' cameras on the movements of Washim District Jail | वाशिम जिल्हा कारागृहातील हालचालींवर ‘सीसी’ कॅमेर्‍याची नजर

वाशिम जिल्हा कारागृहातील हालचालींवर ‘सीसी’ कॅमेर्‍याची नजर

वाशिम : वाशिम जिल्हा कारागृह परिसरातील हालचालींवर बारीक नजर ठेवण्यासाठी सीसी कॅमेर्‍याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. कारागृहाबाहेरचा जवळपास ५00 मीटरचा परिसरदेखील या सीसी कॅमेर्‍यात कैद होत आहे. राज्यातील काही कारागृहातून कैदी पळून गेल्याच्या किंवा नियमबाहय़ बाबी घडल्याच्या घटना राज्याने अनुभवल्या आहेत. या घटनांपासून अनेकांनी बोध घेऊन कारागृह प्रशासनात अधिकाधिक शिस्त आणण्याबरोबरच कारागृहातील हालचालींवर बारीक नजर ठेवण्यासाठी सीसी कॅमेर्‍याचा पर्याय निवडला आहे. वाशिम जिल्हा कारागृहातदेखील सीसी कॅमेर्‍यांची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी कारागृह अधीक्षक आर.एस. चांदणे यांनी जिल्हा विकास नियोजन समितीकडे (डीपीडीसी) पाठपुरावा केला होता. पाच लाख रुपये मंजूर होताच १६ सीसी कॅमेरे बसविण्यात आले आहेत. कारागृहातील व कारागृहाबाहेरील हालचाली या कॅमेर्‍यामध्ये कैद होत आहेत. तसेच वीजपुरवठा खंडित होणे किंवा वीज भारनियमनाच्या काळात कारागृह प्रशासनाला गैरसोयींचा सामना करावा लागत होता. यावर उपाय म्हणून चांदणे यांनी जिल्हा नियोजन विकास समितीमधून सौरऊज्रेच्या सुविधेसाठी पाच लाख रुपयांची मागणी केली होती. पाच लाख रुपये मंजूर झाल्याने सौरऊज्रेची उपकरणे कारागृहात लावण्यात आली आहेत. परिणामी, विद्युत उपकरणांच्या वापरात आपसूकच घट झाली. खासदार निधीमधून सहा लाख रुपये मंजूर झाल्याने सद्य:स्थितीत कारागृह ते राष्ट्रीय महामार्ग अशा अंदाजे ३00 मीटर अंतराच्या सिमेंट काँक्रिट रस्त्याचे काम सुरू आहे.

Web Title: The look of 'CC' cameras on the movements of Washim District Jail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.