शहरं
Join us  
Trending Stories
1
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
2
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
3
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
4
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
5
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
6
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
7
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
8
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
9
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
10
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
11
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
12
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
13
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
14
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
15
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
16
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
17
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
18
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
19
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
20
लग्नाला नकार दिल्याच्या रागातून प्रेयसीसह तिच्या आईची हत्या; दुहेरी हत्याकांडाने विरार हादरले
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019 : निवडणुक काळात झाली कोट्यवधींची उलाढाल !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 16:50 IST

वाशिम : यवतमाळ-वाशिम लोकसभा निवडणुकीदरम्यान प्रचारसाहित्य, वाहनांचा ताफा, पेट्रोल-डिझेल, फ्लेक्स, बॅनर आदी व्यावसायिक दृष्टिकोनातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाल्याची माहिती समोर येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : यवतमाळ-वाशिम लोकसभा निवडणुकीदरम्यान प्रचारसाहित्य, वाहनांचा ताफा, पेट्रोल-डिझेल, फ्लेक्स, बॅनर आदी व्यावसायिक दृष्टिकोनातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाल्याची माहिती समोर येत आहे. दुसरीकडे गत निवडणुकीच्या तुलनेत यावेळी उलाढाल कमी झाल्याचा दावा व्यावसायिकांनी केला.यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात यावेळी एकूण २४ उमेदवार निवडणुक रिंगणात होते. एक, दोन उमेदवारांचा अपवाद वगळता उर्वरीत प्रमुख उमेदवार यवतमाळ जिल्ह्यातील असल्याने ही निवडणूक व्यावसायिक दृष्टिकोनातून वाशिम जिल्ह्यातील विविध प्रकारच्या व्यावसायिकांसाठी फारशी उलाढाल देणारी ठरली नसल्याचा दावा व्यापाऱ्यांनी केला आहे. एरव्ही निवडणूक म्हटली की प्रमुख उमेदवारांचा अधिकृत वाहनांचा ताफा, प्रचारसाहित्य, साऊंड सिस्टिम, फ्लेक्स, बॅनरची गरज अनेक छोट्या-मोठ्या व्यावसायिकांना रोजगार देऊन जाते. वाहन, पेट्रोल-डिझेल, फ्लेक्स, बॅनर, साउंड सिस्टिमचा अपवाद वगळता यावेळीच्या निवडणुकीत खानावळी, पानटपºया, मंडप डेकोरेशन, आॅटो, पेंटर आदी व्यवसायात यावेळी ९० टक्के घट आल्याचा दावा व्यापाऱ्यांनी केला. यावेळी प्रशासकीय यंत्रणेने बाह्यजिल्ह्यातील यंत्रणेकडून मंडप डेकोरेशनचा पुरवठा दिल्याने जिल्ह्यातील मंडप डेकोरेशन व्यावसायिकांसाठी ही निवडणूक निराशाजनक गेली, असा दावा मंडप व साऊंड सिस्टिम व्यावसायिक सुरेश लोथ, पुरूषोत्तम राजगुरू यांनी केला. यावेळी वाहन, फ्लेक्स, बॅनर, पेट्रोल-डिझेल, आॅटो व अन्य छोटे, मोठे व्यवसाय आदींमधून जिल्ह्यातील चार तालुक्यांत जवळपास १० ते ११ कोटींच्या आसपास उलाढाल झाल्याचा दावा व्यापाºयांनी केला.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकyavatmal-washim-pcयवतमाळ-वाशिमwashimवाशिम