थकीत कराअभावी गटविकास अधिकारी यांच्या कार्यालयाला ठोकले कुलूप

By Admin | Updated: March 24, 2015 00:44 IST2015-03-24T00:44:14+5:302015-03-24T00:44:14+5:30

४ लाख रू पयांचा कर थकीत असल्याने रिसोड नगरपरिषदेची जप्तीची कारवाई.

Locked to the office of the District Development Officer due to want to get tired | थकीत कराअभावी गटविकास अधिकारी यांच्या कार्यालयाला ठोकले कुलूप

थकीत कराअभावी गटविकास अधिकारी यांच्या कार्यालयाला ठोकले कुलूप

रिसोड (जि. वाशिम) : गत ५ वर्षापासून पंचायत समितीकडे नगरपरिषदेचा ४ लाख रूपये कर थकीत असल्यामुळे नगरपरिषद मुख्याधिकारी यांच्या आदेशानुसार जप्तीची कारवाई करून पंचायत समिती कार्यालयातील गटविकास अधिकारी यांच्या कार्यालयाला ताला ठोकण्यात आल्याची घटना २३ मार्च रोजी दुपारी २.३0 वाजताच्या दरम्यान घडली. नगरपरिषदेच्यावतिने शहरातील कर वसुली संदर्भात धडक कारवाईची मोहीम सध्या सुरू आहे. या मोहीमेंतर्गंत सदर कारवाई करण्यात आली. पंचायत समिती कार्यालयावर गत पाच वर्षांंपासून चार लाख रूपये इतका कर थकीत होते. भरणा न केल्याने नगरपरिषदेने पंचायत समिती कार्यालयातील गटविकास अधिकारी यांच्या कार्यालयाला कुलूप ठोकून सिलबंद केले. तसेच दरवाज्यावर सदर कारवाई मुख्याधिकारी नगरपरिषद रिसोड यांच्या आदेशनुसार करण्यात आली असल्याचे नमूद केले आहे.

Web Title: Locked to the office of the District Development Officer due to want to get tired

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.