कुलूपबंद कोविड सेंटर पुन्हा उघडणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 05:01 IST2021-02-23T05:01:51+5:302021-02-23T05:01:51+5:30
वाशिम जिल्ह्यात मार्च ते ऑक्टोबरदरम्यान कोरोना विषाणू संसर्गाचा उद्रेक झाला होता. त्यामुळे आरोग्य विभागाला रुग्णांवर उपचार करण्यासाठी शासकीय आणि ...

कुलूपबंद कोविड सेंटर पुन्हा उघडणार
वाशिम जिल्ह्यात मार्च ते ऑक्टोबरदरम्यान कोरोना विषाणू संसर्गाचा उद्रेक झाला होता. त्यामुळे आरोग्य विभागाला रुग्णांवर उपचार करण्यासाठी शासकीय आणि खासगी मिळून १६ कोविड केअर सेंटर उभारण्यात आले होते. त्यानंतर, ऑक्टोबरच्या अखेरपासून कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात आल्याने जिल्हाभरातील खासगी आणि शासकीय मिळून १२ कोविड सेंटर बंद करण्यात आले, परंतु आता कोरोना संसर्ग पुन्हा उफाळत असल्याने, आरोग्य विभागाकडून कुलूप बंद असलेले कोविड केअर सेंटर पुन्हा उघडले जात आहेत. त्यात सोमवारी कारंजा येथील एक, मंगरुळपीर येथील एक, रिसोड तालुक्यातील सवड येथील एक आणि वाशिम येथील एक सेंटर उघडण्यात आले.
--------
१) कोरोनाचे एकूण रुग्ण - ७,७७३
बरे झालेले रुग्ण - ७,११४
कोरोनाचे बळी - १५६
सध्या उपचार सुरू असलेले रुग्ण - ५०२
२) उपजिल्हा रुग्णालयात ४९ रुग्ण (बॉक्स)
तालुका कोविड केअर सेंटर रुग्ण
कारंजा उपजिल्हा रुग्णालय ४९
वाशिम डीसीएच ०७
वाशिम डीसीएचसी ३६
वाशिम रेनॉल्ड हॉस्पिटल ०१
३) कारंजा तालुका धोक्याच्या वळणावर
तालुका रुग्ण
कारंजा १५०
वाशिम १३७
रिसोड ८९
मं.पीर ८९
मालेगाव २२
मानोरा १५
---------------
कोट: सद्यस्थितीत कारंजा येथे एक आणि वाशिम येथे तीन मिळून चार कोविड केअर सेंटर सुरू असून, या सर्व ठिकाणी मिळून ९३ रुग्ण उपचार घेत आहेत. आता जिल्ह्यात वाढत असलेला कोरोना संसर्ग लक्षात घेता, सोमवारी आणखी चार कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले असून, पुढे गरजेनुसार कोविड केअर सेंटरची संख्या वाढविण्यात येणार आहे.
डॉ.अविनाश आहेर, जिल्हा आरोग्य अधिकारी, वाशिम