शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे नेत्रहिनांचा राखी उद्योग ‘लॉकडाऊन’; पहिल्यांदाच परंपरा खंडीत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2020 16:31 IST

अन्य ठिकाणी न जाता यावर्षी गावातच रक्षाबंधन साजरी करण्याची वेळ आली. 

- शिखरचंद बागरेचालोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कोरोनामुळे वाशिम तालुक्यातील केकतउमरा येथील चेतन सेवांकुर ग्रुपच्या नेत्रहीन मुलांच्या राखी उद्योग यावर्षी पहिल्यांदा ‘लॉकडाऊन’ झाला. याशिवाय अन्य ठिकाणी न जाता यावर्षी गावातच रक्षाबंधन साजरी करण्याची वेळ आली. मागील चार महिन्यांपासून सर्वत्र कोरोनाने दहशत निर्माण केली असून, सर्व व्यवहार प्रभावित झालेले आहेत.  परिणामी याची झळ सर्व स्तरातील लोकांना सोसावी लागत आहे. केकतउमरा येथील चेतन सेवांकुर ग्रुपमधील पंधरा नेत्रहीन मुले-मुली स्वत: संगीत कलेत निपून होऊन या संगीतकलेच्या माध्यमाने आपली उपजीविका चालवितात. साधारणत: सात, आठ वर्षांपासून राखी पौर्णिमेदरम्यान सुंदर व आकर्षक राख्यांची निर्मिती करून ते डोळसांनाही लाजवतात. त्यांच्या सुंदर, स्वस्त, आकर्षक राख्यांची मोठ्या प्रमाणात मागणी असते. शाळा, महाविद्यालये, सरकारी कार्यालये अशा विविध ठिकाणी ही मुले स्टॉल लावून राख्यांची विक्री करतात. स्वकष्टाने मिळविलेल्या उत्पन्नातून ही मुले आपल्या दैनंदिन गरजा पूर्ण करतात. दरवर्षी राखी पौर्णिमा येण्याची आतुरतेने वाट पाहणारी ही मुले दोन महिन्यापूर्वीपासूनच राख्या बनवायला सुरवात करतात. यावर्षी सर्वच राख्यांच्या व्यवसायावरही गडातंर चेतन सेवांकूर ग्रूपलाही फटका बसला. कोरोनामुळे राख्यांची आकर्षक निर्मिती तसेच रक्षा बंधन सर्वत्र साजरा करण्याची चेतन सेवांकूर ग्रूपची परंपरा यावर्षी प्रथमच खंडीत झाली आहे. घरगुती पद्धतीने यावर्षी रक्षा बंधन साजरा केला जाणार आहे. कोरोनामुळे राखी उद्योग लॉकडाऊन झाला; शिवाय चेतन सेवांकूर ग्रूपमधील सदस्यांच्या आनंदावरही विरजन पडले.

टॅग्स :washimवाशिमRakhiराखी