पशुधन चोरी प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:46 IST2021-08-14T04:46:56+5:302021-08-14T04:46:56+5:30
वाशिम ग्रामीण पोलीस स्टेशनच्या ठाणेदारांनी शेतकरी तडस यांना दिलेल्या पत्रानुसार या पशुधनाच्या चोरीचा तपास पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे ...

पशुधन चोरी प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे
वाशिम ग्रामीण पोलीस स्टेशनच्या ठाणेदारांनी शेतकरी तडस यांना दिलेल्या पत्रानुसार या पशुधनाच्या चोरीचा तपास पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला असून, पशुधन चोरीप्रकरणी कलम ३८० भादंवि अन्वये अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. गत जानेवारी महिन्यापासून तालुक्यातील ग्राम केकतउमरा, अडोळी, विळेगाव, तोंडगाव येथील शेतकऱ्यांच्या दुभत्या म्हशी व बैलजोडी चोरीच्या घटनांमुळे या परिसरातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. जानेवारीपासून सलग सात ते आठ वेळा झालेल्या चोऱ्यांमुळे या परिसरातील शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, थंडबस्त्यात पडलेल्या तपासामुळे चोरट्यांची हिंमत वाढली असताना शासनाकडून चोरी गेलेल्या या गोधनापोटी कोणतीही नुकसानभरपाई न मिळाल्यामुळे या शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. चोरट्यांच्या प्रतापाने त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रारी केल्या होत्या. अशातच केकतउमरा येथील शेतकरी गोविंदा तडस यांच्या १ लाख ८० हजार रुपये किमतीच्या तीन मुऱ्हा म्हशी चोरी गेल्याने तडस यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.