शौचालय बांधकामासाठी आजीबार्इंची अशीही लगबग
By Admin | Updated: April 12, 2017 13:30 IST2017-04-12T13:30:21+5:302017-04-12T13:30:21+5:30
ब्राह्मणवाडा येथील ७५ वर्षीय गिताबाई गोविंदा घुगे या आजीबार्इंनी घरी वैयक्तिक शौचालय बांधकाम सुरू केले.

शौचालय बांधकामासाठी आजीबार्इंची अशीही लगबग
शिरपूर जैन (वाशिम)- ब्राह्मणवाडा येथील ७५ वर्षीय गिताबाई गोविंदा घुगे या आजीबार्इंनी घरी वैयक्तिक शौचालय बांधकाम सुरू केले असून, शौचालयाचा दरवाजा खरेदी करण्यासाठी गुरूवारी मालेगाव गाठले. मुले घरी नसल्याने आजीबाई स्वत: मालेगावात आल्या आणि बसस्थानक परिसरातील एका दुकानातून दरवाजा खरेदी केला. हा दरवाजा डोक्यावर घेऊन आजीबाई ५०० मीटर अंतरापर्यंत पायदळ जात आॅटो स्टॅण्डजवळ गेल्या. आॅटोमधून दुपारी त्या ब्राह्मणवाडा गावाकडे रवाना झाल्या.