शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

परवानाधारक रिक्षाचालकांना मिळणार अर्थसहाय्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 11:29 IST

Licensed autorickshaw drivers will get financial assistance: सर्व परवानाधारक रिक्षा चालकांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावे लागणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर परवानाधारक रिक्षाचालकांना एक वेळ अर्थसहाय्य म्हणून १५०० रुपये देण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. ही रक्कम थेट त्यांच्या बॅंक खात्यात जमा करण्यासाठी संगणक प्रणाली विकसीत करण्यात आली असून सर्व परवानाधारक रिक्षा चालकांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावे लागणार आहे. यामध्ये रिक्षाचालकांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयातील मदत कक्ष सर्व कार्यालयीन दिवसांसोबत सुटीच्या दिवशीही सुरु राहणार आहे, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी ज्ञानेश्वर हिरडे यांनी दिली.कडक निर्बंधाच्या काळात रिक्षा चालकांना अर्थसहाय्य म्हणून १५०० रुपये इतके देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.यासाठी सर्व परवानाधारक रिक्षा चालकांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले आहेत. परवानाधारक रिक्षाचालकास शासनाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करता येईल. अर्जदाराने ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर परिवहन कार्यालयामार्फत अर्जातील नमूद तपशिलाची कार्यालयातील अभिलेख्यांशी पडताळणी केली जाईल. ही पडताळणी झाल्यानंतर ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज मंजूर करुन अर्जदाराच्या बॅंक खात्यात १५०० रुपये शासनाकडून जमा करण्यात येतील. ही सर्व प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होणार असल्याने कार्यालयात येण्याची व उपस्थित राहण्याची आवश्यकता नाही. मात्र अर्ज भरताना अडचण आल्यास कार्यालयाच्या मदत कक्षात ९८३४५५९७९७ या दूरध्वनीवर संपर्क साधता येणार आहे. रिक्षाचालकांना तातडीची मदत उपलब्ध व्हावी, यासाठी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयात कर्मचाऱ्यांनी नियुक्ती करण्यात आली आहे. हे कामकाज कार्यालयीन तसेच सुटीच्या दिवशीही सुरु राहणार आहे, असे हिरडे यांनी सांगितले. 

असा करावा ऑनलाईन अर्जशासनाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज सादर करताना अर्जदाराच्या मोबाईल क्रमांकावर ओटीपी क्रमांक प्राप्त होईल. या ऑनलाईन अर्जात वाहन क्रमांक, ड्रायव्हिंग लायसन्स क्रमांक, ऑटोरिक्षा परवाना क्रमांक, वाहन क्रमांक, आधार क्रमांक नमूद करावा लागेल. वारसदार असल्यास तो पर्यायही निवडावा लागेल. आधार कार्ड ,मोबाईल क्रमांक आणि बॅंक खाते हे परस्परांशी संलग्न केलेले असणे अनिवार्य आहे. आपल्या अर्जाची प्रत्यक्ष स्थिती अर्जदार आपल्या मोबाईलवर तपासू शकतो.

टॅग्स :washimवाशिम