आदीवासी शेतक-यांना आधुनिक कृषी प्रक्रिया विकासाचे धडे !
By Admin | Updated: October 10, 2014 00:25 IST2014-10-09T23:47:59+5:302014-10-10T00:25:31+5:30
डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात स्वतंत्र प्रशिक्षण वर्ग.

आदीवासी शेतक-यांना आधुनिक कृषी प्रक्रिया विकासाचे धडे !
अकोला : विदर्भातील आदीवासी शेतकर्यांमधून उद्योजक निर्माण व्हावेत, यासाठी त्यांना आधुनिक कृषी प्रक्रीया तंत्रज्ञानाचे धडे देण्यात येत असून, याकरीता डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात स्वतंत्र प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात आला आहे.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठामध्ये दिल्लीच्या भारतीय कृषी संशोधन परिषदेंतर्गत (आयसीएआर) अखिल भारतीय समन्वयीत प्रकल्प कापणी पश्चात तंत्रज्ञान विभागाच्या उपयोजनेतून शेतमाल प्रक्रिया प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमातंर्गत आदीवासी शेतकर्यांना आधुनिक कृषी प्रक्रिया तंत्रज्ञान प्रशिक्षण देऊन त्यांच्यामध्ये उद्यमशिलता, उद्योजक निर्माण करण्यावर भर देण्यात येत आहे. दर्याखोर्यात राहणार्या या शेतकर्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी भारतीय कृषी संशोधन परिषदेने कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून प्रयत्न सुरू केले आहे त. यासाठी भारतीय कृषी संशोधन परिषदेने अखिल भारतीय समन्वयीत प्रकल्प, कापणी पश्चात तंत्रज्ञान विभागाला तीन लाखाचा निधी उपलब्ध करू न दिला आहे. आदिवासी शेतकर्यांना प्रक्रिया उद्योग तंत्रज्ञान देण्यासाठी आठ प्रशिक्षण वर्ग आणि प्रात्यक्षिक व जनजागृती अभियान राबविण्यात येणार आहे.
हे प्रशिक्षण कृषी विद्यापीठाच्या अकोला मुख्यालयी देण्यात येणार असून, त्यासाठी या शेतकर्यांना प्रवासभाडे आदी खर्च दिला जाणार आहे. दोनशे ते अडीचशे शेतकर्यांना प्रशिक्षित केले जाणार आहे. या अगोदर कापणी पश्चात तंत्रज्ञान विभागाने काही आदीवासी शेतकर्यांना प्रशिक्षण दिले असून, काही शेतकर्यांनी शेतमालावर आधारित प्रक्रिया उद्योग आदीवासी भागात सुरू केला आहे. हे शेतकरी या प्रशिक्षणवर्गात शेतकर्यांना प्रोत्साहन देणार आहेत.
या प्रशिक्षण वर्गातून आदीवासी शेतकर्यांमध्ये प्रक्रिया उद्योगासह, आत्मविश्वास निर्माण करण्यावर भर देण्यात येत आहे. पहिल्या आदीवासी प्रशिक्षण शिबिराला बुधवारी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रविप्रकाश दाणी यांच्याहस्ते सुरू वात करण्यात आली. एकात्मिक आदीवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते.
आदीवासी शेतकर्यांना प्रशिक्षण देण्यासाठी आयसीएआरने निधी उपलब्ध करू न दिला असून, या शेतकर्यांना उद्योजकता प्रशिक्षण देण्यात येत आहे. यापूर्वी कृषी विद्यापीठाने आदीवासी शे तकर्यांना प्रशिक्षण देऊन उद्योजक निर्माण केले असल्याचे डॉ.पंदेकृविचे संशोधन अभियंता डॉ. प्रदिप बोरकर यांनी सांगीतले.