शैक्षणिक गुणवत्तेसोबत विद्यार्थ्यांना श्रमदानाचे धडे
By Admin | Updated: April 19, 2017 19:41 IST2017-04-19T19:41:51+5:302017-04-19T19:41:51+5:30
वाशिम : विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच श्रमदानाचेही महत्व कळावे यासाठी वाशिम तालुकयतील देपूळ येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षकांच्यावतिने विद्यार्थ्यांना श्रमदानाचे धडे गिरविल्या जात आहेत

शैक्षणिक गुणवत्तेसोबत विद्यार्थ्यांना श्रमदानाचे धडे
वाशिम : विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच श्रमदानाचेही महत्व कळावे यासाठी वाशिम तालुकयतील देपूळ येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षकांच्यावतिने विद्यार्थ्यांना श्रमदानाचे धडे गिरविल्या जात आहेत.
देपूळ येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षणावर भर देण्यासोबतच भौगोलीक क्षेत्रावर नैसर्गिंक सौदर्य वाढविण्याचा स्तुत्य उपक्रम राबविला आहे. यामध्ये शिक्षकांसह विद्यार्थ्यांचे श्रमदान मोलाचे ठरत आहे. हे कार्य करतांना लोकवर्गणीही मोठया प्रमाणात गोळा होत आहे. देपूळ येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये इयत्ता पहिली ते सातवी पर्यतचे शिक्षण आहे. सर्व भाषांच्या ज्ञानासोबतच विविध उपक्रमात विद्यार्थ्यांना सहभागी करण्यात येते. यासाठी मुख्याध्यापक सुरेश उगले, शिक्षक गजानन ढगे, दिलीप आखंड, संजिवनी चव्हाण, मायादेवी मोगले, नामदेव चव्हाण , शिल्पा इंगळे, आर.टी. राठोड परिश्रम घेत आहेत. श्रमदानाचे धडे विद्यार्थ्यांना मिळावे याकरीता शाळेच्यावतिने पालकांना श्रमदान व लोकवर्गणीचा विषय देपूळचे सरपंच गजानन खुशालराव गंगावणे यांच्याकडे मांडला असता त्यांनी मदतीचा हात पुढे केला. आज शाळेमध्ये स्वच्छता, वृक्षारोपणाने संपूर्ण वातावरण हिरवेगार झालेले दिसून येत आहे.