वसतिगृहातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे धडे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2017 19:22 IST2017-09-03T19:21:30+5:302017-09-03T19:22:36+5:30

स्पर्धा परीक्षेसंदर्भात माहिती देण्याच्या दृष्टिकोनातून स्थानिक आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृहात २ सप्टेंबर रोजी स्पर्धा परीक्षेचा सराव पेपर घेण्यात आला. जवळपास ६० विद्यार्थ्यांचा सहभाग लाभला.

Lessons for the competition students in the hostel! | वसतिगृहातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे धडे !

वसतिगृहातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे धडे !

ठळक मुद्देआदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृहात घेण्यात आला स्पर्धा परीक्षेचा सराव पेपर ६० विद्यार्थ्यांचा सहभाग 

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम - स्पर्धा परीक्षेसंदर्भात माहिती देण्याच्या दृष्टिकोनातून स्थानिक आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृहात २ सप्टेंबर रोजी स्पर्धा परीक्षेचा सराव पेपर घेण्यात आला. जवळपास ६० विद्यार्थ्यांचा सहभाग लाभला.
विद्यार्थीदशेतच स्पर्धा परीक्षेचे धडे देण्यासाठी वसतिगृह प्रशासनाने स्पर्धा परीक्षेचे सराव पेपर घेण्याचा संकल्प सोडला आहे. वसतिगृहातील विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षेचा अभ्यासक्रम, परीक्षेचे स्वरुप, महाराष्ट्र लोकसेवा आयोग व संघ लोकसेवा आयोगाची परीक्षा आदींसंदर्भात प्राथमिक स्वरूपातील माहिती देण्याचा प्रयत्न म्हणून २ सप्टेंबरला आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह येथे सराव पेपर घेण्यात आला. वसतिगृहाचे अधीक्षक शैलेश वानखेडे यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. आठवड्यातील शनिवार किंवा रविवार या सुट्टीच्या दिवशी सराव पेपर घेतला जाणार आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षेची ओळख करून दिली जाणार आहे. 

Web Title: Lessons for the competition students in the hostel!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.