१६ फेब्रुवारीपासून कुष्ठरोग शोध मोहीम
By Admin | Updated: February 3, 2015 00:04 IST2015-02-03T00:04:11+5:302015-02-03T00:04:11+5:30
वाशिम जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी दिली माहीती.

१६ फेब्रुवारीपासून कुष्ठरोग शोध मोहीम
वाशिम : जिल्ह्यात १६ फेब्रुवारी ते २१ फेब्रुवारी २0१५ या कालावधीत कुष्ठरोग शोध मोहिम राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मोहन बायस यांनी दिली.
कुष्ठरोगाबाबत जनजागृती म्हणून जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरातून रॅली काढण्यात आली. जिल्हा परिषदचे आरोग्य सभापती चक्रधर गोटे यांनी या रॅलीला हिरवी झंडी दाखविली.यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मोहन बायस, आरोग्य सेवा (कुष्ठरोग) चे सहाय्यक संचालक डॉ. जी. के. सिरसुलवार, जिल्हा कुष्ठरोग सल्लागार डॉ. पावडे, वाशिम येथील रामराव सरनाईक समाजकार्य महाविद्यालयाचे प्रा. पवार, प्रा. बारड व सरस्वती समाजकार्य महाविद्यालयाचे प्रा. गोरे, सहाय्यक संचालक आरोग्य सेवा (कुष्ठरोग) कार्यालयाचे पर्यवेक्षक व्ही. टी. चव्हाण, संदीप धोंगडे, बी. टी. राजगुरू, मोरे, सुभाष इंगोले, मानकर, गलांडे उपस्थित होते. रॅलीमध्ये रामराव सरनाईक समाजकार्य महाविद्यालय व सरस्वती समाजकार्य महाविद्यालयाचे विद्यार्थी सहभागी झाले होते.