विधानसभा निवडणुकीवर लोकसभा निवडणुकीचे सावट!

By Admin | Updated: May 17, 2014 23:11 IST2014-05-17T22:39:47+5:302014-05-17T23:11:58+5:30

गवळींना मिळालेली आघाडी पाच विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला अल्टीमेटम देणारी आहे.

Legislative elections elections! | विधानसभा निवडणुकीवर लोकसभा निवडणुकीचे सावट!

विधानसभा निवडणुकीवर लोकसभा निवडणुकीचे सावट!

वाशिम: यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघापैकी तब्बल पाच विधानसभा मतदारसंघात यावेळी शिवसेना-भाजपच्या उमेदवार भावना गवळींना मिळालेली प्रचंड आघाडी काँग्रेसला अल्टीमेटम देणारी आहे. मागील निवडणुकीत गवळींना काँग्रेसचे तत्कालीन उमेदवार हरिभाऊ राठोड यांच्यापेक्षा ५६,८६७ मतांची आघाडी मिळाली होती.आता त्यांना ९३,८१८ मतांची आघाडी मिळाली आहे. लोकसभा निवडणुकीपाठोपाठ अवघ्या चार महिन्यांच्या कालावधीनंतर राज्यात विधानसभेच्या निवडणुका होत आहेत.त्यामुळे या निवडणुकीतील स्थिती सुधारण्यासाठी विद्यमान आमदारांकडे पुरसा वेळ नाही.आजची स्थिती पाहता येणारी विधानसभा निवडणूक यवतमाळ विधानसभा मतदारसंघामधील कॉग्रेसच्या आमदार नंदिनी पारवेकर, राळेगाव विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार वसंत पुरके, तसेच कारंजा विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश डहाके याच्या विरोधात वातावरण तयार होण्याचे हे संकेत असून त्यांना येणारी विधानसभेची निवडणूक चांगलीच जड जाण्याची शक्यता आहे.

*आता लागणार खरी कसोटी

विरोधी बाकावरील खासदार म्हणून भावना गवळी यांनी सदैव र्मयादा असल्याचीच सबब पुढे केली आहे. जिल्ह्यातील महत्वाकांक्षी रेल्वे मार्ग यासह अनेक विकासात्मक बाबींना पूर्णत्वास आणण्याची संधी खासदार गवळी यांच्याकडे सत्तेच्या रुपाने आली आहे. सलग चार वेळा विरोधी बाकावून काम करण्याचा लोकसभेतील अनुभव त्यांच्याकडे आहे. अशा स्थितीत यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातील समस्या कशा तडीस नेल्या जातात याकडे सर्वांच्या नजरा लागणार आहे. हीच खरी खासदार गवळी यांच्या कसोटीची वेळ आहे. आता कुठलीही सबब त्यांच्याजवळ शिल्लक राहिलेली नाही.

Web Title: Legislative elections elections!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.