कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:41 IST2021-03-18T04:41:42+5:302021-03-18T04:41:42+5:30
.......... जऊळका येथे गर्दी अनियंत्रित वाशिम : मालेगाव तालुक्यातील जऊळका रेल्वे येथे सकाळपासून सायंकाळपर्यंत मोठ्या प्रमाणात गर्दी राहत असून ...

कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर उत्साहात
..........
जऊळका येथे गर्दी अनियंत्रित
वाशिम : मालेगाव तालुक्यातील जऊळका रेल्वे येथे सकाळपासून सायंकाळपर्यंत मोठ्या प्रमाणात गर्दी राहत असून विशेषत: मुख्य चौकात दिवसभरातून अनेकवेळा वाहतूक विस्कळीत होत आहे. दुकानांमध्ये कोरोनाविषयक नियम पाळला जात नसल्याचे पहावयास मिळत आहे.
...........
किन्हीराजात बिजवाई कांदा बहरला
वाशिम : किन्हीराजा परिसरात काही शेतकऱ्यांनी यंदा बिजवाई कांद्याची लागवड केलेली आहे. पोषक वातावरणामुळे हे पीक चांगलेच बहरल्याचे दिसून येत आहे.
............
मेडशी येथील पाणीपुरवठा सुरळीत
वाशिम : काही महिन्यांपुर्वी गावात पाणीपुरवठा अधूनमधून विस्कळीत होत होता. ग्रामपंचायतीच्या विद्यमान पदाधिकाऱ्यांनी अडचणी दूर करून पाणीपुरवठा सुरळीत केल्याने ग्रामस्थांची सोय झाली आहे.
.......
शिरपूर परिसरातील शेतकरी अडचणीत
वाशिम : शिरपूर परिसरात दुग्धोत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने आहेत. असे असताना दुधाला योग्य दर मिळणे अशक्य झाल्याने हे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. जनावरे पोसणेही कठीण झाल्याचे बोलले जात आहे.
.........
महामार्गाच्या कामाला गती देण्याची मागणी
मालेगाव : येथून वाशिमकडे येणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे काम संथ गतीने सुरू असून वाहतुक विस्कळीत होत आहे. ही बाब लक्षात घेऊन महामार्गाच्या कामाला गती देण्याची मागणी होत आहे.