आघाडी,भाजप व राष्ट्रवादीची बाजी

By Admin | Updated: July 14, 2014 23:39 IST2014-07-14T23:39:55+5:302014-07-14T23:39:55+5:30

वाशिमध्ये जिल्हा पून्हा विकास आघाडीची बाजी

Leaders of BJP, NCP and BJP | आघाडी,भाजप व राष्ट्रवादीची बाजी

आघाडी,भाजप व राष्ट्रवादीची बाजी

वाशिम : जिल्हा विकास आघाडीच्या लताताई उलेमाले तथा शिवसेनेच्या कृष्णाताई गोरे यांच्यात १४ जुलैला झालेला नगराध्यक्षपदाचा सामना अखेर आघाडीच्या उलेमाले यांनी जिंकला. त्यांना आघाडीच्या १२ , कॉग्रेसच्या एका व राष्ट्रवादीच्या पाच अशा एकूण १८ागरसेवकांची मते मिळाली तर गोरे यांना केवळ शिवसेनेच्या आठ नगरसेवकांच्या मतावर समाधान मानावे लागले. नऊ मतांनी त्या पराभूत झाल्या.उपाध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी कांँग्रेसचे मोहम्मद जावेद पहेलवान व शिवसेनेच्या अश्‍विनी पत्की यांच्यात लढत झाली.यामध्येही जावेद पहेलवान यांनी नऊ मतांनी पत्की यांचा पराभव केला २७ सदस्य संख्या असलेल्या या पालिकेत सत्ता स्थापनेसाठी किमान १४ नगरसेवकांची आवश्यकता होती. कुणाकडेही हा जादुई आकडा नव्हता. परंतु गत अडीच वर्षापूर्वी जिल्हा विकास आघाडी व राष्ट्रवादी कॉग्रेस यांनी युती करून नगर पालिकेची सत्ता ताब्यात घेतली होती. यावेळी मात्र राष्ट्रवादी कॉग्रेसने नगराध्यक्षपदावर दावा सांगितल्यामुळे या युतीत दरार निर्माण होते की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु वरिष्ठ पातळीवरून सुत्रे हालल्यामुळे यावेळीही ही युती अभेद्य राहीली. राष्ट्रवादीच्या सायराबी बेनिवाले यांनी दाखल केलेले नामांकन परत घेतल्यामुळे आघाडीसाठी ही निवडणूक अधिकही सोपी झाली. १४ जुलैला पार पडलेल्या निवडणूकीत जिल्हा विकास आघाडीच्या लताताई उलेमोले यांना १८ तर शिवसेनेच्या कृष्णाताई गोरे यांना केवळ ८ मते मिळाली. उपाध्यक्षपदाच्या निवडणूकीतही राष्ट्रवादीचे मो. जावेद १८ मते घेऊन विजयी झाले.्र तर शिवसेनेच्या अश्‍विनी पत्की पराभूत झाल्या.

** कारंजा मध्ये भाजपने फिरविली 'भाकरी'

कारंजा : येथील नगराध्यक्षपदाच्या निवडणूकीत राष्ट्रवादी कॉग्रेसच्या तव्यावर भाजणारी भाकर ऐनवेळेवर भारतीय जनता पक्षाने फिरविली. राष्ट्रवादी कॉग्रेसच्या तंबुत सुरूंग लावून नगराध्यक्षपद आपल्याकडे खेचण्यात भाजपाने यश मिळविले. भाजपाच्या निशा गोलेच्छा १७ मते घेउन विजयी झाल्या तर राष्ट्रवादीच्या आशालता कांत यांना १0 मतांवर समाधान मानावे लागले. उपाध्यक्षपदी भाजपाच्या जरीना धन्नू भुरीवाले या अविरोध विजयी झाल्या. स्थानिक नगर पालिकेच्या सभागृहात १४ जुलैला झालेल्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी राष्टवादीकडून आशालता कांत तर भाजपाच्या निशा गोलेच्छा निवडणुक रिंगणात होत्या. यावेळी हात उंचावून मतदान घेण्यात आले. निशा गोलेच्छा नरेंद्र गोलेच्छा, मो. युसुफ मो. शफी पुंजाणी, मेघा निखील घुडे, कुमूद नांदेडकर, जरील धन्नू भुरीवाले, पल्लवी ढेंडुळे, वंदना राउत, एजाजखॉ हबीबखा, कनिजाबी सुभानखा, रुबिनाखानम नुरुस्ताखॉ, हनिसाबानी इरशादअली, लल्लो जुम्मा जट्टावाले, अ.रशिद अ.सत्तार, अविनाश फुलबरकर अविनाश, अनिस खॉ बशिरखॉ, सावन चंदेल या १७ नगरसेवकांनी पाठींबा दिला. देत १७ मते घेऊन विजयी केले तर राष्ट्रवादीच्या डॉ. आशालता कांत यांना संजय काकडे, शितल बरडिया, पियुषा भोयर, निर्मलाबाई जाधव, अविनाश दहातोंडे, नितीनकुमार गढवाले, मिलींद खंडारे, संगिता अतुल चिमेगावे, प्रसन्ना आग्रेकर यांची १0 मते मिळाली. राष्ट्रवादी कॉग्रेसचे पालिकेतील गटनेता युसूफ पुंजानी यांनाच आपल्या तंबूत खेचण्यात भारतीय जनता पक्ष यशस्वी झाला. कॉग्रेसच्या काही नगरसेवकांनाही भाजपला मतदान केले. पालिकेच्या उपाध्यक्षपदाकरीता भाजपाच्या धन्नू जरीना भुरीवाले यांचा एकमेव अर्ज असल्याने त्यांना अविरोध विजयी घोषीत करण्यात आले. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी दिनकर काळे व सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार श्रीकांत उंबरकर व नगर परीषद कर्मचार्‍यांनी सहकार्य केले.

** मंगरूळपीरात परळीकर यांची अविरोध निवड

मंगरूळपीर : स्थानिक नगराध्यक्षपदाच्या निवडणूकीत राष्ट्रवादी कॉग्रेसचे चंदु परळकर यांचे एकमेव नामांकन असल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी त्यांना अविरोध निवडुण आल्याचे घोषीत केले. तर उपाध्यक्षपदी फारुक अहमद उर्फ बब्बु सौदागर यांची अविरोध निवड झाली आहे. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसिलदार बळवंत अरकराव यांनी काम पाहीले. निवडणूक प्रक्रियेत काँग्रेस व राष्ट्रवादी कॉग्रेसचे १३ नगरसेवक उपस्थित होते तर विरोधी पक्षाचे चार सदस्य गैरहजर होते यावेळी नगर सेवक अशोक परळीकर, सुमनताई परवीन, अनोबी अ.बशीर, ौ.सविता मिसाळ, सौ.ज्योतीताई जहागीरदार, सौ.नंदाताई कडूकार, ङ्म्रीमती चंद्रकलाबाई मुळे, रमेश कडुकार, यांचेसह मिलींद पाकधने रा.काँ.शहराध्यक्ष सचिन परळीकर, विनोद परळीकर, भास्कर मुळे, सदानंद जहाँगीरदार, जोवदभाई सौदागर, विशाल ठाकुर, ,कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

Web Title: Leaders of BJP, NCP and BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.