कोरोना लसीकरण जनजागृती मोहिमेचा शुभारंभ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:18 PM2021-03-01T16:18:22+5:302021-03-01T16:18:34+5:30

Corona Vaccination Awareness Campaign मोहिमेचा शुभारंभ १ मार्च रोजी जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आला.

Launch of Corona Vaccination Awareness Campaign | कोरोना लसीकरण जनजागृती मोहिमेचा शुभारंभ 

कोरोना लसीकरण जनजागृती मोहिमेचा शुभारंभ 

googlenewsNext

वाशिम : माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या प्रादेशिक लोक संपर्क ब्युरो, अमरावती विभागामार्फत जिल्ह्यात कोरोना लसीकरण आणि आत्मनिर्भर भारत जनजागृती मोहिमेचा शुभारंभ १ मार्च रोजी जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आला.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश मोहिते, सहायक जिल्हाधिकारी वैभव वाघमारे, निवासी जिल्हाधिकारी शैलेश हिंगे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी संदीप महाजन, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, मानव विकास मिशनचे जिल्हा नियोजन अधिकारी सोनखासकर, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुभाष राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती. लसीकरणाविषयी लोकांच्या मनात असलेले गैरसमज दूर करणे हा या जनजागृतीमागील उद्देश आहे. या मोहिमेअंतर्गत डिजिटल चित्ररथ वाशिम शहर तसेच जिल्ह्यात मंगरूळपीर, कारंजा, मानोरा, रिसोड आणि मालेगाव तालुक्यातील ग्रामीण भागात जावून कोविड लसीकरण व आत्मनिर्भर भारत विषयी प्रचार व प्रसिद्धी करणार आहे. या चित्ररथ निर्मितीकरिता जागतिक आरोग्य संघटना, युनिसेफ आणि महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाचे सहकार्य लाभले आहे. डिजीटल चित्ररथाद्वारे जिल्ह्यात दरदिवशी आठ ते दहा गावात प्रचार करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन क्षेत्रीय प्रसिद्धी अधिकारी इन्द्रवदनसिंह झाला यांनी केले. या मोहिमेकरीता अंबादास यादव, श्रीकांत जांभुलकर यांनी संयोजन केले. शाहीर मधुकर गायकवाड आणि संच हे कोरोना आणि आत्मनिर्भर भारत याविषयी कलापथकाच्या माध्यमातून माहिती देणार आहे.

Web Title: Launch of Corona Vaccination Awareness Campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.